शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची चळवळ व्हावी; इव्हेन्ट नको

By admin | Updated: November 5, 2014 23:58 IST

लोकमत जागर; फोटोपुरते अभियान उद्देशहीन

बुलडाणा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बुलडाण्याने प्रत्येक वर्षी चमकदार कामगिरी करून राज्याचे लक्ष वेधून घेतले. गावागावांत स्वच्छतेची चळवळ उभी राहिली व आजही ही चळवळ बर्‍यापैकी सातत्य टिकून आहे. या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान हे अधिक गतिमान होण्याची गरज होती. मात्र, या अभियानाला प्रारंभापासूनच सरकारी चौकट चिटकली. केवळ फोटो काढून हे अभियान सुरू करीत असल्याचे वातावरण सर्वत्र असल्याने स्वच्छ भारत अभियान हा इव्हेंट ठरला असून, ती चळवळ होण्यासाठी मानसिकताच बदलविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे सुरुवात सन २000-२00१ मध्ये करण्यात आली. पहिल्याच वर्षी या अभियानात खामगाव तालुक्यातील पळशी या गावाने बाजी मारली. दुसर्‍या वर्षी वकाणा चमकले, पाळा, बोराळा, धोत्रा नंदई, दत्तपूर, अंत्रज, उबाळखेड, अजिसपूर, मांडवा फॉरेस्ट, राहुड, निरोड, दगडवाडी, खोर अशा अनेक गावांनी या अभियाना त सातत्य ठेवत दरवर्षी आपले नाव अमरावती विभागापर्यंत नेले. तीच शृखंला यावर्षी मडा खेड बु. या गावाने वृद्धिंगत केली आहे. गावागावांत सुरू झालेले हे स्वच्छतेचे वारे संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित होते. लोकांचा सहभाग, त्याला सरकारचा हातभार असे या अभियानाचे स्वरूप असल्याने हे अभियान आजही पूर्वीच्या तीव्रतेने नसले तरी आपले अस्तित्व टिकवून आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ भार त अभियान राबविण्याची गरज आहे. स्वच्छता हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ औपचारिकता म्हणून या अभियानाकडे न पाहता सर्वांनी आपले योगदान दिले, तर आपला परिसर, गाव, शहर स्वच्छ होईल, आरोग्यदायी होईल. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी व्यक्त केले तर स्वच्छ भारत अभियान हे लोकांचे आहे व लोकांच्या सहकार्याने प्रशासनाच्या सोबतीने ते राबवायचे आहे. त्यामुळे कुणीही या अभियानापासून दूर राहू नये, सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनी केले आहे.