शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला ६0 पॉझिटिव्ह रुग्ण

By admin | Updated: February 24, 2015 00:20 IST

क्षयरोगाचा विळखा सुटेना: एका वर्षात बुलडाणा जिल्ह्यात आढळले ८६३ क्षयरोग रुग्ण.

नीलेश शहाकार / बुलडाणा: समाजातील क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे; मात्र तरीही बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला क्षयरोगाचे ६0 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याची माहिती पुढे आली आहे. बुलडाण्यात क्षयरोग निर्मूलनासाठी स्वतंत्र रुग्णालय असतानाही क्षयरोगासारख्या भयानक रोग जिल्ह्याला विळखा घालत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्याभरात क्षयरोग रुग्ण सर्वेक्षण कार्यक्रम सुरु आहे. एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला असल्यास अशा रुग्णास संशयित म्हणून थुंकीची तपासणी स्थानिक क्षयरोग प्रयोगशाळेत केली जाते. जिल्ह्यातील रुग्णांचा रक्तनमुना नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. डॉट्स उपचार पद्धतीने अशा रुग्णांवर उपचार करुन त्यांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा क्षयरोगधाम येथे कॅट-१ व कॅट-२ या दोन उपचार पद्धतीने दर सहा महिन्यांनी रुग्णांची तपासणी केली जाते. तीन महिन्यांनी पुन्हा रुग्णांच्या परिस्थितीची माहिती घेतली जाते. आरोग्य विभागाने तयार केलेल्या वार्षिक अहवालात प्रत्येक महिन्याला ६0 क्षयरोग रुग्ण आढळून आले; तर वर्षभरात ८६३ रुग्णांना क्षयरोग आढळून आला आहे. सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग व क्षयरोग डॉ. के.एस.वासनिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी क्षयरोग रुग्णांकडून बर्‍याच वेळा औषध वेळेत घेण्याबाबत दुर्लक्ष केले जाते. औषधांच्या अनियमिततेमुळे टीबीच्या विषाणूंवर नियंत्नण येण्याऐवजी ते विषाणू अधिक प्रभावी झाले असल्याचे सांगीतले. गत तीन वर्षात जिल्ह्यात क्षयरुग्णांची संख्या बर्‍याच प्रमाणात कमी झाली असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. *जिल्हा आरोग्य विभागाच्या क्षय निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ५७५ रुग्णांची संशयीत म्हणून क्षय रोगांसाठी थुंकी व रक्त तपासणी करण्यात आली. यात २ हजार ७१२ रुग्णांना क्षयरोग झाला नसल्याचे उघड झाले, तर ८६३ रुग्णांना क्षयरोग आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.