शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

आमदार आकाश फुंडकरांनी घेतली शंकर महाराजांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 3:29 PM

खामगाव :  जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकर महाराज यांची बुधवारी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. फुंडकर यांनी भेट घेतली.

खामगाव :  जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकर महाराज यांची बुधवारी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. फुंडकर यांनी भेट घेतली. यावेळी देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज, इलोरा संस्थानचे तुकाराम महाराज, शेगाव येथील ओंकार महाराज-वेरूळकर यांनीही शंकर महाराजांची आस्थेने विचारपूस केली.

जागृती आश्रमातील काहींचा त्रास असह्य झाल्याने, शंकरजी महाराज रविवारी अचानक तपोवनातून निघून गेले होते. त्यानंतर तब्बल दोन दिवसांनी त्यांचा ओंकारेश्वर येथे शोध लागला होता. मंगळवारी दुपारी शंकर महाराज तपोवनात पोहोचले. तेव्हापासून याठिकाणी पश्चिम विदर्भातील भाविकांची तपोवनात गर्दी होत आहे. बुधवारी पहाटेच देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज तपोवनात पोहोचले. त्यानंतर सखारामपूर-इलोरा येथील तुकाराम महाराज आणि शेगाव येथील आेंकार महाराज वेरूळकर शंकर महाराजांच्या भेटीसाठी आले. त्याचप्रमाणे दुपारी १२:३० वाजता खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी तपोवनात जाऊन शंकर महाराजांची भेट घेतली. यावेळी जागृती परिवाराचे प्रमोद पाटील, महेंद्र रोहणकार यांच्यासह जागृती परिवारातील सदस्यांसोबतच शेकडो भाविकांची उपस्थिती होती.

महाराजांच्या सोबत असल्याची हजारो भाविकांची ग्वाही!

जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकर महाराज खामगाव नगरीचेच नव्हे तर संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्राचे वैभव आहेत. त्यांचा समाजसेवेचा वसा अनुकरणीय असून, कोणत्याही दबावाला आणि त्रासाला न जुमानता महाराजांनी आपले सेवाकार्य सुरू ठेवावे, अशी ग्वाही हजारो भाविकांनी ‘तपोवना’त  यावेळी दिली. मंगळवारप्रमाणेच बुधवारीही भाविकांचा तपोवनात  ओघ दुपारपर्यंत सुरूच होता.

जागृतीच्या माध्यमातून प.पू. शंकर महाराजांनी सेवाकार्य यापुढेही सुरू ठेवावे. आपण स्वत: जागृतीचे एक घटक आहोत. त्यामुळे जागृतीच्या संकटात आपण सोबत होतो. यापुढेही जागृतीला आपले सर्वोतोपरी सहकार्य राहील.

- अ‍ॅड. आकाश फुंडकर

आमदार, खामगाव मतदार संघ 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा