अल्पवयीन मुलाने केला चिमुकलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:41 IST2019-12-09T14:41:36+5:302019-12-09T14:41:43+5:30
एका अल्पवयीन मुलाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिला जवळ बोलावून वाईट उद्देशाने तिचा हात पकडला.

अल्पवयीन मुलाने केला चिमुकलीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात डिसेंबर रोजी ेएका अल्पवयीन मुलाने चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
खामगाव शहरात शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलगी सात डिसेंबरला दुपारी एकटीच जात होती. तिला एकटे पाहून परिरातील एका अल्पवयीन मुलाने दुपारी दोन वाजेच्या सुमारास तिला जवळ बोलावून वाईट उद्देशाने तिचा हात पकडला. सोबतच तिचा विनयभंग केला.
घडलेला हा प्रकार चिमुकलीने घरी तिच्या आईस कथन केला. त्यानंतर पीडित मुलीच्याकुटुंबियांनी प्रकरणाची शहानिशा करत खामगाव शहर पोलिस ठाणे गाठत अल्पवयीन आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अल्पवयीन मुला विरोधात चिमुकलीचा विनयभंग केल्या प्रकरणी तथा पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास खामगाव शहर पोलिस करीत आहेत.
अपघातात एकाचा मृत्यू
खामगाव : बुलडाणा रोडवरील गोंधनापूर जवळ सात डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या रस्ते अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. मात्र या संदर्भात खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे मृतकाचे नावही स्पष्ट होऊ शकले नाही.