मेहकर : ‘थर्टी फस्ट’ला धुमाकुळ घालणा-या युवकांविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 20:11 IST2018-01-01T20:03:29+5:302018-01-01T20:11:20+5:30
मेहकर : ३१ डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणाºया आठ युवकांविरुद्ध मेहकर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

मेहकर : ‘थर्टी फस्ट’ला धुमाकुळ घालणा-या युवकांविरूद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : थर्टी फस्टला युवकांनी धुमाकुळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी आठ जणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सरत्या वर्षाला निरोप देवून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळया प्रकारे पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काहींनी फटाके फोडून तर काहिंनी भक्तीमय, आर्केस्ट्रा अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर काही युवकांनी दारु पिवून वेगवेगळया ठिकाणी धुमाकुळ व धिंगाणा घालून सार्वजनीक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला असता मेहकर पोलिसांनी रामदास निवृत्ती नखाते, महेश रविंद्र निकम, गणेश भगवान खवले, शुभम सुनिल गवई, शंकर विश्वनाथ लहाने, अमिस शहा ईस्माईल शहा, रमेश विरचंद्र चौधरी, विजय सखाराम दुबे या युवकांविरुध्द विविध कलकान्वये गुन्हा दाखल केला आहे.