तंटामुक्तीची सभा पोलिस बंदोबस्तात
By Admin | Updated: August 21, 2014 00:14 IST2014-08-20T22:35:04+5:302014-08-21T00:14:13+5:30
ग्रामपंचायतीची ग्रामसभा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी इतिहासीक ग्रामसभा ठरली

तंटामुक्तीची सभा पोलिस बंदोबस्तात
सिंदखेडराजा : तालुक्यात सर्वात मोठय़ा साखरखेर्डा ग्रामपंचायतीची ग्रामसभा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी इतिहासीक ग्रामसभा ठरली असून, किमान दोन हजाराहून अधिक लोकांची उपस्थिती होती. प्रथम तणावपूर्ण वातावरणात होणारी निवडणूक राजकीय नेत्यांच्या मध्यस्तीने एकतर्फी झाली.
१५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन प्रत्येक गावात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यात यावी, असा आदेश शासनाचा होता. त्यानुसार साखरखेर्डा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ९ वाजताची वेळ देण्यात आली होती. त्यासाठी जमनाप्रसाद तिवारी, मदनसेठ जैस्वाल, राजेंद्र ठोके, दिलीप बेंडमाळी, दिलीप इंगळे, रमेश गवई, नितीन फकिरा कंकाळ यासह दोन महिलांनी अर्ज दाखल केले होते. कोरम अभावी १५ ऑगस्टची ग्रामसभा १९ ऑगस्टला घेण्यात आली. जि.प.सदस्या सौ.स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एस.ई.एस. हायस्कूलच्या विस्तीर्ण परिसरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अगोदर राजकीय नेत्यांच्या मध्यस्तीने दिलीप इंगळे, रमेश गवई, मदनसेठ जैस्वाल, दिलीप बेंडमाळी, राजेंद्र ठोके यांचेसह दोन महिलांचे अर्ज मागे घेण्यात आले.
अध्यक्ष पदासाठी जमनाप्रसाद तिवारी आणि नितीन फकिरा कंकाळ हे दोनच अर्ज राहिले. त्यात ग्रामसभेत जमनाप्रसाद तिवारी यांना एकतर्फी लोकांनी पसंती दिल्याने त्यांची निवड करण्यात आली. यावेळी दिलीप इंगळे यांनी तिवारी यांच्या नावाची जाहिर घोषणा केली तर अर्जून गवई यांनी अनुमोदन दिले.
ग्रामसभेला शिवसेना नेते रविंद्र पाटील, सरपंच सुधाकर गवई, माजी सरपंच कमलाकर गवई, चंद्रशेखर शुक्ल, उपसरपंच रामदाससिंग राजपूत, ग्रा.पं.सदस्य जिवनसिंग राजपूत, माजी उपसभापती सुनिल जगताप, गणेशसिंग राजपूत, माजी जि.प.सदस्य एम.के.गवई, संतोष जैस्वाल, संजय जैस्वाल, युसूफसेठ कुरेशी, सदस्य रफीक सह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव मनोज मोरे यांनी काम पाहिले. यावेळी पोलिस बंदोबस्त होता.