विवाहित महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:43 IST2019-03-04T13:43:06+5:302019-03-04T13:43:11+5:30

साखरखेर्डा: येथील विवाहित महिलेवर गावातीलच एका युवकाने बलत्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २ मार्च रोजी सायंकाळी घडली.

 Married woman rape and threatend to killed | विवाहित महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

विवाहित महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी

साखरखेर्डा: येथील विवाहित महिलेवर गावातीलच एका युवकाने बलत्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २ मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीस तत्काळ अटक केली. ३ मार्च रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
साखरखेर्डा येथील एक विवाहित महिला २ मार्च रोजी सायंकाळी पाणी भरण्यासाठी बबन मुदमाळी यांच्या शेतातील विहिरीवर गेली होती. दरम्यान, पाण्याचा भरलेला हंडा घेऊन परत येत असताना गावातीलच भगवान सुधाकर अवचार या युवकाने विवाहित महिलेच्या डोक्यावरील हंडा खाली पाडून तिचा जबरीने हात पकडून भागावती नदी काठावरील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकी भगवान अवचार याने दिली. महिलेच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी भगवान अवचार यास अटक केली. पीएसआय दीपक राणे यांनी मेडिकल रिपोर्टवरून आरोपी भगवान अवचार याच्या विरुद्ध कलम ३७६, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. आज आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.

Web Title:  Married woman rape and threatend to killed