Married couple casting vote in khamgaon | विवाहित जोडप्याने केले मतदान!
विवाहित जोडप्याने केले मतदान!

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: खामगाव विधानसभा मतदार संघातील दोन नवरदेवांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी तर एका विवाहित जोडप्याने लग्न लागल्यानंतर मतदान केले. लोकशाहीच्या लोकोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होत या विवाहित जोडप्याने मतदान करण्याचे आवाहन केले.

स्थानिक सुटाळ पुरा भागातील अरूण दिवाणे यांचे चिरंजीव विजय याचा श्री प्रभाकर क्षीरसागर यांची कन्या पूजा हिच्याशी गुरूवारी दुपारी पार पडला. महाविर भवनात दुपारी विवाह सोहळा पार पडल्यानंतर वर विजय याने ए.के.नॅशनल हायस्कूल मध्ये तर वधू पूजा हिने झाकीर हुसेन नगर परिषद  शाळा क्रमांक ८ मध्ये जाऊन मतदान केले. मतदानासाठी हे जोडपे सोबतच गेले. यावेळी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत या नवविवाहित जोडप्याने मतदान केले. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहनही नवविवाहित जोडप्याने यावेळी केले.

 


Web Title: Married couple casting vote in khamgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.