विवाहितेचा छळ; सात जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 11:16 IST2021-03-16T11:16:23+5:302021-03-16T11:16:37+5:30

Khamgaon Crime News ३३ वर्षीय विवाहितेचा पैशासाठी सासरच्या मंडळीने छळ केल्याची घटना उघडकीस आली.

Marital harassment; Crimes against seven people | विवाहितेचा छळ; सात जणांविरुद्ध गुन्हा

विवाहितेचा छळ; सात जणांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कंत्राटी आरोग्य सहाय्यिका म्हणून कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय विवाहितेचा पैशासाठी सासरच्या मंडळीने छळ केल्याची घटना उघडकीस आली.  याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाळापूर माहेर असलेल्या मनिषा अवसरमोल यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, त्यांचा पगार देण्यावरून तसेच वाहनाचे हप्ते भरण्यासाठी व बांधकाम करण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करून त्यांचा पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. त्यावरून पोलिसांनी पती सचिन अवसरमोल, कांता प्रकाश अवसरमोल, प्रकाश अवसरमोल सह अन्य व्यक्तीवर गुन्हे दाखल केले.

Web Title: Marital harassment; Crimes against seven people