आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज रस्त्यावर ; मलकापूरात तहसिलदाराच्या गाडीचा काच फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:42 IST2018-07-23T13:39:05+5:302018-07-23T13:42:59+5:30
मलकापूर : आरक्षणाच्या मुद्यावरून विदर्भाच्या प्रवेशद्वारी सोमवारी, २३ जुलैरोजी सकाळी ११ वाजता सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला.

आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज रस्त्यावर ; मलकापूरात तहसिलदाराच्या गाडीचा काच फोडला
लोकमत न्युज नेटवर्क
मलकापूर : आरक्षणाच्या मुद्यावरून विदर्भाच्या प्रवेशद्वारी सोमवारी, २३ जुलैरोजी सकाळी ११ वाजता सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. ‘एक मराठा लाख मराठा, नागपूरचा पोपट काय म्हणतो, मराठ्यांना आरक्षण नाही म्हणतो’, अशा विविध गगनभेदी घोषणानी मलकापूर शहर दणाणले. दरम्यान, एका आंदोलकाने रागाच्या भरात तहसिलदारांच्या गाडीचा काच फोडला.
या आंदोलनास राजकीय व सामाजिक संघटनांनी जाहिर पाठींबा दिला. तर सरकारच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी मुंडण करीत निषेध नोंदवला. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सकल मराठा समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून मलकापूर परिसरातील सकल मराठा समाजाची एक बैठक शिवाजी नगरस्थित भवानी मंदिरात पार पडली. त्यात सोमवारच्या आंदोलनाची दिशा ठरली. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार, जनशक्ती पक्ष यासह विविध राजकीय, सामजिक संघटनांनी पाठींबा दिला. सोमवारी सकाळी ११ वाजता चिमुकल्यांच्या हस्ते शिवाजी नगरस्थित आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याचे विधीवत पूजन केले. त्यानंतर आंदोलक मुक्ताईनगर रस्त्याने एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा विविध गगणभेदी घोषणा देत तहसिलकार्यालयावर पोहचला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सकल मराठा समाज बांधवांनी तहसिलकार्यालय आवारात ठिय्या आंदोलन केले. यावेळी समाजातील प्रमुख नेत्यांनी व युवा नेत्यांनी आंदोलकातील यथोचित मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही युवकांनी सामूहीक मुंडण करून राज्यशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान तहसिलदारांच्या गाडीचा काच फोडणाºया आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.