लग्नपत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधू पित्याचा अपघातात करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 13:59 IST2019-05-06T13:59:10+5:302019-05-06T13:59:13+5:30
देऊळगावमही: मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधूपित्याच्या दुचाकीस शिवशाही बसने धडक दिल्याने वधुपित्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

लग्नपत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधू पित्याचा अपघातात करुण अंत
देऊळगावमही: मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून गावी परतणाऱ्या वधूपित्याच्या दुचाकीस शिवशाही बसने धडक दिल्याने वधुपित्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात देऊळगावमही चिखली रोडवरील एका ढाब्यानजिक घडला.
नजीकच्या डिग्रस बू. येथील उद्घव भानुदास खटके (वय ४५) हे चिखलीकडून आपल्या मुलीच्या लग्न पत्रिका वाटप करून दुचाकी (क्रमांक एम. एच. २८ एवाय ३५६८) या दुचाकीने देऊळगावमहीकडे परत येत होते. हॉटेल प्रसाद ढाब्याजवळ देऊळगावराजाकडून भरधाव वेगात असलेल्या शिवशाही पुणे-चिखली (एम.एच.०९ एम. १७७५) क्रमांकाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात उद्धव खटके यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षापासून नागपुर -औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी अर्धवट खोदकाम, रस्ते कामामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. या महामार्गावर दिवसागणिक अपघात होत असून, य अपघातामुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे. या राष्ट्रीय महामागार्चे काम जलद गतीने करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)