शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अनेक गावांमध्ये सुरू झाल्या हातभट्ट्या

By admin | Updated: April 24, 2017 00:24 IST

खामगाव- मद्यपींनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी महामार्गालगतच्या अनेक गावांमध्ये हातभट्ट्या सुरू होत असल्याचे चित्र आहे.

महामार्गावरील दारूबंदीचा असाही परिणामनितीन निमकर्डे - खामगावमहामार्गावरील दारू विक्रीस सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने दारु विक्रीच्या अनेक दुकानांवर गंडांतर आले असून, मद्यपींची पंचाईत झालेली आहे. त्यामुळे काही मद्यपींनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी महामार्गालगतच्या अनेक गावांमध्ये हातभट्ट्या सुरू होत असल्याचे चित्र आहे.राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर होणाऱ्या दारू विक्रीमुळे दारू पिवून वाहन चालविण्याचे व अपघातांचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावरून न्यायालयाने महामार्गांवरील दारू विक्री बंद करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. त्यानुसार ३१ मार्च २०१७ नंतर नवीन परवाने देणे शासनाने बंद केले. तसेच महामार्गावरील व महामार्गापासून ५०० मीटरच्या परिघातील दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात न आल्याने ते परवाने संपुष्टात आले आहेत. परिणामी जिल्ह्यातील विविध महामार्गांवरील शेकडो दुकानांना टाळे लागले आहेत. यामुळे मद्यपींची मात्र चांगलीच पंचाईत झालेली असून, चोरट्या मार्गाने होणारी दारू विक्री वाढली आहे, तर दुकाने बंद झाल्याने अनेक मद्यपींनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविला असल्याचेही दिसून येते. या संधीचा फायदा घेण्यासाठी महामार्गालगतच्या काही गावांमध्ये नव्याने हातभट्ट्या सुरू होत असल्याचे दिसून येते. संघटित विरोधाची तयारीकाही ठिकाणी हातभट्ट्यांना संघटित विरोध करण्याची तयारी नागरिकांनी विशेषत: महिलांनी चालविली आहे. गावात नव्याने दुकाने सुरु करू पाहणाऱ्यांनाही ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये याकरिता निवेदन देण्यात येत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात दारू विक्रेते व हातभट्टीची दारू गाळणाऱ्यांविरुद्ध अनेक गावात संघर्षाचे प्रसंग उभे राहतील, असे दिसून येते.