मलकापूर ठाणेदार लाच घेताना अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 14:26 IST2017-05-03T14:26:37+5:302017-05-03T14:26:37+5:30

स्थानिक पोलिस स्टेशनच्या ठोणदारांना ३५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

Malkapur Thangarak detained while taking bribe | मलकापूर ठाणेदार लाच घेताना अटकेत

मलकापूर ठाणेदार लाच घेताना अटकेत

मलकापूर: स्थानिक पोलिस स्टेशनच्या ठोणदारांना ३५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई बुधवारी दुपारी १२ वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली.
मलकापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी शहरात आनंद मेळाव्याच्या परवानगीसाठी संबधीतांना ३५ हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी आनंद मेळाव्याच्या संचालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी दुपारी १२.३० वाजता ठाणेदार दीपक कोळी यांना एसीबी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Malkapur Thangarak detained while taking bribe