मलकापूर : भरधाव ट्रकची बसला धडक; विद्यार्थिनींसह १0 जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:41 AM2017-12-16T00:41:47+5:302017-12-16T00:44:17+5:30

मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात  १0 प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ  शुक्रवारी, १५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरुष, दोन महिला व सात  विद्यार्थिनींचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात  आले.

Malkapur: Ship of the truck carrying the truck; 10 students injured including students | मलकापूर : भरधाव ट्रकची बसला धडक; विद्यार्थिनींसह १0 जण जखमी 

मलकापूर : भरधाव ट्रकची बसला धडक; विद्यार्थिनींसह १0 जण जखमी 

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग सहावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ घडली घटनाजखमींमधये एक पुरुष, दोन महिला व सात विद्यार्थिनींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात  १0 प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ  शुक्रवारी, १५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरुष, दोन महिला व सात  विद्यार्थिनींचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात  आले.
एसटी बस (एमएच ४0-एन ८७७५) वाघोळ्यावरून मलकापूरसाठी निघाली होती.  सकाळी ११ वाजेच्या सुमारस राष्ट्रीय महामार्गावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ पाठीमागून  भरधाव आलेल्या ट्रकने (एमपी ४४ एचए 0४६५) बसला  धडक दिली.  त्यात देवीदास फकिरा लहासे (वय ३९), सविता उत्तम पाचपोळ ( ४0 रा. वाघोळा), दुर्गा  अशोक काचकुटे (२२ रा. तांदूळवाडी), रोशनी शंकर सरदार (१४), साक्षी सुरेश अहीर  (१२), कल्याणी प्रकाश अहिर (१३), शीतल गणेश घुगरे (१४), अंकिता सुरेश  लोणकर (१४), सरस्वती दत्तात्रय वसने (१४), संजीवनी अशोक घाईट (१४, सर्व रा.  वाघोळा) जखमी झाले.  मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमीवर उपचार  करण्यात आले. आगार प्रमुख दराडे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन राज्य परिवहन  महामंडळाच्यावतीने जखमींना सानुग्रह मदत दिली आहे.  

Web Title: Malkapur: Ship of the truck carrying the truck; 10 students injured including students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.