मलकापूर : दाताळा येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी सासू, नणंदेस अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:26 IST2018-01-02T00:25:33+5:302018-01-02T00:26:15+5:30

मलकापूर (बुलडाणा): विवाहितेची सासरच्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना दाताळा येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मृतकाच्या सासू व नणंदेस अटक केली. चुलत सासर्‍याचा शोध सुरू आहे.   आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Malkapur: The murder of mother-in-law, son-in-law, arrested in Ratnagiri | मलकापूर : दाताळा येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी सासू, नणंदेस अटक 

मलकापूर : दाताळा येथील विवाहितेच्या खूनप्रकरणी सासू, नणंदेस अटक 

ठळक मुद्देनवर्‍यावर उपचार, चुलत सासर्‍याचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर (बुलडाणा): विवाहितेची सासरच्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना दाताळा येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मृतकाच्या सासू व नणंदेस अटक केली. चुलत सासर्‍याचा शोध सुरू आहे.   आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
तालुक्यातील मौजे घिर्णी येथील रहिवासी रेखा हिचा विवाह मौजे दाताळा येथील योगेश दिगंबर तायडे याच्याशी झाला होता. पित्याकडून शेताच्या हिश्शाचे पैसे माग, असा तगादा लावून सासरची मंडळी मृतक रेखा योगेश तायडे हिला शारीरिक, मानसिक त्रास देत होते, असे पोलीस तक्रारीत नमूद आहे. रविवारी सकाळी ११ वाजता दाताळ्यातील भगवान गल्लीतील राहत्या घरी रेखा रक्ताच्या थारोळ्यात गावकर्‍यांना आढळून आली. गावकर्‍यांनी तिला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्याच दरम्यान मृत महिलेचा पती योगेश तायडेने विष प्राशन करून मलकापूर ग्रामीण पोलिसात सदर घटना कथन केली. पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आज सोमवारी तपास अधिकारी, पोलीस निरीक्षक विजय साळुंके यांनी मृत विवाहितेची सासू निर्मला दिगंबर तायडे, नणंद विजया जगन्नाथ शेगोकार अशा दोघींना अटक केली. चुलत सासरा प्रल्हाद तुळशीराम तायडे याचा शोध पोलीस घेत आहेत. विष प्राशनाने अत्यवस्थ चौथा आरोपी योगेश तायडेवर अकोल्यात उपचार सुरू आहेत. आरोपी महिलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

Web Title: Malkapur: The murder of mother-in-law, son-in-law, arrested in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.