शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

मलकापूर : वयोवृद्ध इसमाचा संशयास्पद मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:36 AM

मलकापूर :  येथील कुलमखेल प्रभागात ६५ वर्षीय इसमाचा राहत्या घरासमोर ओट्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. घडली. त्याच्या डोक्याला मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी सोमवारी सकाळीच ७ वाजता मृत व त्यांच्या पुतण्यादरम्यान शाब्दीक वाद व पकडापकडी झाल्याने या घटनेत शहरभर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. 

ठळक मुद्देराहत्या घरासमोर ओट्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर :  येथील कुलमखेल प्रभागात ६५ वर्षीय इसमाचा राहत्या घरासमोर ओट्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. घडली. त्याच्या डोक्याला मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी सोमवारी सकाळीच ७ वाजता मृत व त्यांच्या पुतण्या  शाब्दीक वाद व पकडापकडी झाल्याने या घटनेत शहरभर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, कुलमखेल प्रभागातील रहिवासी रमेश हरिभाऊ चोपडे (वय ६५) त्यांच्या राहत्या घरी गावातून दूध आणून बसले असताना अचानक खाली पडले व त्यांच्या नाकाला घसडे बसून व डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या माहितीस दुजोरा देत शहर पोलिसांनी र्मग १७/१७ कलम १७४ जा.फौ. अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती दिली. मात्र आजच सोमवारी सकाळी ७ वाजता मृत रमेश चोपडे यांचा त्यांच्या पुतण्याशी शाब्दीक वाद होऊन पकडापकडीची घटना घडली होती. त्याविषयी मृताचा मुलगा प्रमोदने भांडणातून त्यांच्या नाकाला मार लागला व खाली पडल्याची माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसांचा तपास वैद्यकीय अहवालावर येऊन थांबला आहे.दरम्यान, याप्रकरणी तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक आशिष लवंगळे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू आहे, असे सांगितले; मात्र काका-पुतण्यात वाद झाल्याने या घटनेविषयी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. शहरात यानिमित्ताने वेगवेगळ्या शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Malkapurमलकापूर