शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र ‘अंनिस’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 12:05 IST

Initiative to help flood victims : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘साथी हात बढाना’ असे आवाहन समितीकडून करण्यात आले असून, त्यासाठी राज्यभरातील सदस्य कामाला लागले आहेत. 

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, अशा पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘साथी हात बढाना’ असे आवाहन समितीकडून करण्यात आले असून, त्यासाठी राज्यभरातील सदस्य कामाला लागले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात महापूरने थैमान घातले आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना मदतीची नितांत गरज आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रतिकुटुंब दहा हजार रुपये रोख व धान्य स्वरूपात पाच हजार रुपयांची मदत राज्याच्या सर्व पूर व आपत्तीग्रस्त भागात देण्याची घोषणा पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. परंतु या मदतीची प्रतीक्षा न करता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यभरातून मदत कार्य करण्यास सुरुवात केली आहे. 

अशी दिली जाते मदतपूरग्रस्त कुटुंबाला प्रत्यक्ष भेटून मदत देण्यात येत आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, नवीन कपडे, चादरी, ब्लँकेट, शाली, शैक्षणिक साहित्य, फूड पॅकेट, पाणी बॉटल, औषधे या वस्तू प्राधान्याने देण्यात येत आहेत. मदतीसाठी चांगला प्रतिसादही मिळत आहे. या मदतीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समिती सदस्य सक्रिय झाले आहे. २५ जुलैपासून राज्यभरातून मदत कार्य सुरू आहे. 

महाराष्ट्र अंनिसने राज्यभरातील कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. त्यानुसार समिती सदस्य काम करत आहेत. गेल्या तीन दिवसात मदतीचा ओघ चांगला दिसून आला. आपली मदत थेट गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. - प्रशांत पोतदार, राज्य कार्यकारिणी सदस्य, सातारा 

महापूरलामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र अंनिसचे सर्व सदस्य काम करत आहेत. विदर्भातूनही मदतीचा ओघ वाढावा, हीच अपेक्षा.    

       - नरेंद्र लांजेवार, ज्येष्ठ कार्यकर्ते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :buldhanaबुलडाणाKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर