पैनगंगेच्या तीरावरील कोलवड येथील महादेव मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:04 AM2018-02-13T01:04:08+5:302018-02-13T01:04:59+5:30

बुलडाणा :  तालुक्यातील कोलवड येथील पैनगंगा व वरखडी संगमावर असलेले जागृत हेमाडपंती शिवशंकराचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे o्रद्धास्थान आहे.  महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Mahadev Temple at Kolavad on the bank of Penganga | पैनगंगेच्या तीरावरील कोलवड येथील महादेव मंदिर

पैनगंगेच्या तीरावरील कोलवड येथील महादेव मंदिर

googlenewsNext
ठळक मुद्देमहाशिवरात्रीला उसळते गर्दी  यात्रा महोत्सवाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  तालुक्यातील कोलवड येथील पैनगंगा व वरखडी संगमावर असलेले जागृत हेमाडपंती शिवशंकराचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे o्रद्धास्थान आहे.  महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
पैनगंगा व वरखडी नद्यांच्या संगमावर शिवशंकराचे हेमाडपंती जागृत मंदिर दगडाच्या चिर्‍यामध्ये बांधले होते, अशी माहिती मिळते. हे मंदिर जीर्ण झाल्यामुळे कोलवड ग्रामस्थ व सागवन येथील माधवआप्पा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला होता. 
हेमाडपंती मंदिर असताना मंदिरातील पिंड खोलवर होती; परंतु जीर्णोद्धार करताना ग्रामस्थांच्या विचार विनिमयानंतर शंकराची पिंड वर घेण्यात आली, तर मंदिराच्या जुन्या दगडाचा उपयोग पायाभरणीमध्ये करून षटकोनी सिमेंटच्या विटात मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर भाविक भक्तांच्या सुविधेसाठी मंदिर परिसरात सभामंडप बांधण्यात आला. या मंदिराची स्थापना कोणी केली, याबाबत माहिती मिळत नसली, तरी मंदिर परिसरात मोठे पिंपळाचे जुने झाड व मंदिरासमोर दीपमाळ होती, असे वृद्ध मंडळी सांगतात. कालांतराने दीपमाळ पाडण्यात आल्याने त्याठिकाणी गणपतीची मूर्ती आढळली. यावेळी सागवनचे बसू आप्पा यांनी मोठय़ा भक्तीभावाने या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधून दिले.  वतनदार पहाडसिंग पाटील व म्हातारजी पाटील यांनी मंदिरावर जाणार्‍या रस्त्यासाठी जागा दिल्याने रस्ता तयार करण्यात आला. मंदिर परिसरातील सोयी-सुविधेमुळे काही भाविक भक्त आपल्या मुला-मुलींचे लग्न या ठिकाणी लावतात, तर महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, भाविक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून शिवमंदिर ट्रस्ट प्रयत्न करीत असल्याचे तेजराव पाटीलबा पाटील व रामराव बंडूजी पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Mahadev Temple at Kolavad on the bank of Penganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.