शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य प्राप्तीपासून मढी गाव मूलभूत सुविधांपासून वंचित!

By admin | Updated: May 7, 2017 02:17 IST

आमदारांसह सर्व अधिकार्‍यांनी केली पाहणी

किशोर मापारी लोणार : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वैज्ञानिक प्रगती करत देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना गेल्या ७0 वर्षांंपासून तालुक्यातील आदिवासीबहुल मढी गाव विकासापासून वंचित आहे. मढी गावात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. चारही बाजूनी जंगल असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी दीड वर्षापूर्वी मढी गावाला भेट देऊन संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना विकासकामे त्वरित सुरू करण्यासाठी सांगितले होते. परंतु, अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे गेल्या दीड वर्षात रस्ते व पाणी प्रश्न कायम असल्यामुळे मढी ग्रामस्थ किती हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यासाठी तालुक्यातील सर्वच कार्यालयप्रमुखांना घेऊन आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी ५ मे रोजी मढी गावाला अधिकार्‍यांची वारी करून आणली.तालुक्यातील मराठवाड्याच्या टोकावर असलेले मढी घनदाट जंगलाच्या आणि डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव आहे. जेमतेम ३00 लोकसंख्या असल्यामुळे मढी आणि सावरगाव मुंढे ही दोन गावे मिळून एक गटग्रामपंचायत आहे. गेल्या ७0 वषार्ंपासून आदिवासीबहुल मढी गावाला कोणताही पक्का किंवा कच्चा रस्ता नसल्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही. रस्त्याअभावी वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी पोहचू न शकल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गावात पाणी आणि वीज नसल्यामुळे ग्रामस्थ नरकयातना भोगत जीवन जगत आहेत. याची जाणीव झाल्याने आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी दीड वर्षांंपूर्वी मढी गावाला भेट देऊन पाहणी करत समस्या जाणून घेतल्या होत्या. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजा प्रथम पूर्ण करण्यात याव्यात, याबाबत त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचनादेखील केल्या होत्या. परंतु वर्षभराचे बिल एकदमच आल्याने ग्रामस्थ वीज बिल भरू शकले नाहीत. यामुळे पुन्हा त्यांना उन्हाळ्यात दिवसा उकाड्यात आणि रात्री अंधारात राहावे लागत आहे. अधिकार्‍यांच्या काम न करण्याच्या वृत्तीमुळे ग्रामस्थ अजूनही नरकयातना भोगत जीवन जगत असल्याची माहिती मिळताच आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी तालुक्यातील सर्वच प्रशासकीय कार्यालयप्रमुखांना सोबत घेऊन गावाची वारी घडवून आणली. गावात फिरून तेथील हलाखीची परिस्थिती दाखवून दिली. त्यामुळे आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी निर्णय घेत १३ मे रोजी रस्ता आणि विहिरीचे भूमिपूजन करण्यात येईल, तसेच आमदार निधीतून सभामंडप करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.