पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा), दि. १२- प्रेयसीनेच आपल्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली. प्रेयसीने हत्येची कबुली दिली असून याप्रकरणी शनिवारी प्रेयसीसह तिघांविरुद्ध खुनाचा दाखल करण्यात आला आहे.सैलानी दर्गा परिसरातील वनामध्ये १ नोव्हेंबरच्या रात्री अनोळखी इसमाचे गवळीबाबा दग्र्याजवळ आढळले होते. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मृतकाचे छायाचित्रासह माहीती जालना जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनला दिली होती. या छायाचित्रावरुन मृतक बाबासाहेब खरात यांच्या नातेवाईकाने ओळख पटविली. यानंतर रायपूर पोलिसांनी बाबासाहेब खरात यांचे घर गाठले. यावेळी मृतकाच्या आई वडीलांनी सांगितले की बाबासाहेबची पत्नी गेल्या काही दिवसांपासून वेगळी राहत होती. मृतकाचे शारदाबाई आसाराम म्हस्के या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यांनीच माझ्या मुलाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी बाबासाहेबची प्रेयसी शारदा म्हस्केला ताब्यात घेऊन चौकशी केला. तेव्हा शारदाने सांगितले की, १ नोव्हेंबरला बाबासाहेब, महादेव म्हस्के, सीमा संतोष सातपूते यांच्यासोबत आपण घरुन सैलानी येथे गेलो. रात्री त्याची हत्या केली. यानंतर सकाळी उठून गावाकडे पुन्हा परतलो. प्रेयसीच्या या कबुलीनंतर पोलिसांनी शारदासह तिघांवर भादंवि ३0२ खुनाचा गुन्हा दाखल केला करुन तिघांना अटक केली.
प्रेयसीनेच केला प्रियकराचा खून
By admin | Updated: November 13, 2016 02:19 IST