शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

बुलडाणा जिल्ह्यातील दीड हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:55 PM

आता बदलेल्या नियमांचा जिल्ह्यातील शेतकºयांना फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील एक हजार ६१६ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ होणार आहे. परवानाधारक शेतकºयांनी कार्यक्षेत्राबाहेर वाटप केलेले कर्जही आता नियमाच्या कक्षेत आल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यापूर्वीही जिल्ह्यातील एक हजार ४४० शेतकºयांचे तीन कोटी चार लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले होते. त्यानंतर आता बदलेल्या नियमांचा जिल्ह्यातील शेतकºयांना फायदा होणार आहे.दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात सहकार विभागाने अवैध सावकारी विरोधात ९२ प्रकरणात धडक कारवाई केली होती. त्यामुळे जवळपास ५३ शेतकºयांची जमीन तथा तत्सम स्थावर मालमत्ता सावकारी पाशातून मुक्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दरम्यान, राज्य शासनाने यापूर्वी एप्रिल २०१५ मध्ये शेतकºयांचे सावकारी कर्ज माफ केले होते. ३१ नोव्हेंबर २०१४ पर्यंत थकीत सावकारी कर्ज असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार ४४० शेतकºयांना त्याचा लाभ झाला होता. त्यावेलीया शेतकºयांचे तीन कोटी चार लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले होते. पाच टप्प्यात हे कर्ज माफ करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या टप्प्यात नोव्हेबंर २०१५, दुसºया टप्प्यात फेब्रुवारी २०१६, तिसºया टप्प्यात मार्च २०१६, चौथ्या टप्प्यात एप्रिल २०१६ आणि पाचव्या टप्प्यात मार्च २०१७ या अनुक्रमाने हे कर्ज माफ करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी अध्यक्ष व संबंधित जिल्हा उपनिबंधक सचिव असलेल्या समितीने तालुक्यांवरून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून यादी अंतिम केली होती. या योजनेमध्ये सहकार विभागाच्या दहा एप्रिल २०१५ च्या शासन आदेश्चाय अटीनुसार हे कर्ज माफ करण्यात आले होते. त्यामध्ये संबंधीत परवानाधारक शेतकºयांनी त्यांच्या परवाना कार्यक्षेत्राबाहेरील कर्ज मात्र अपात्र ठरविण्यात आले होते. आता कार्यक्षेत्राबाहेर परवानाधारक सावकाराने ३० नोव्हेंबर पर्यंत वाटलेले सावकारी कर्ज यामध्ये पात्र ठरणार आहे. अनुषंगीक कर्जदारांच्या याद्यांची पूनर्तपासणीनंतर हे सावकारी कर्ज माफ करण्यासंदर्भात हालचाली होणार आहेत. जिल्हा समितीने ज्या दिवशी प्रस्तावाला मान्यता दिली, त्या दिनाकांपर्यंत कर्ज व व्याज माफ होणार असल्याची माहिती आहे.

१६ प्रकरणात अवैध सावकारी सिद्धकलम १६ अंतर्गत जिल्हा उपनबिंधक कार्यालयाने २६ ठिकाणी अवैधसावकारी प्रकरणात गेल्या दीड वर्षात धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये नऊ प्रकरणात अवैधसावकारी सिद्ध झाली तर काही प्रकरणे निकाली निघाली आहेत. दुसरीकडे कलम १६ अंतर्गतच सुधारीत तरतुदीतंर्गत १६ प्रकरणात थेट सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावरच सात प्रकरणात अवैध सावकारी सिद्ध झाली असून त्यामध्ये पोलिसांत गुन्हे ही दाखल करण्यात आले आहे. साबेतच काही उर्वरित प्रकरणात अनुषंगीक प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सुत्रांनी सांगितले.५३ प्रकरणात स्थावर मालमत्ता परतअवैध सावकारी प्रकरणी गेल्या काही काळात धडक कारवाई करून कलम १८ अंतर्गत ५३ प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ३१ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित शेतकºयांची स्थावर मालमत्ता जसेकी शेत, भूखंड व अन्य स्थावर परत देण्यात आले आहे. यापैकी चार प्रकरणे ही खंडपीठात गेली असून १६ प्रकरणे विभागीय निबंधकांकडे अपिलामध्ये सुरू आहेत तर दोन प्रकरणामध्ये प्रतिवादी व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी