शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या - ना.पंकजा मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:11 IST

सिंदखेडराजा : ज्या जिजाऊंनी शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे, ही बाब चिंताजनक असून, मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या शुभारंभाप्रसंगी केले.

ठळक मुद्देजिजाऊ जन्मोत्सवाचा साधला मुहूर्त ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा शुभारंभ 

अशोक इंगळे। लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : ज्या जिजाऊंनी शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे, ही बाब चिंताजनक असून, मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या शुभारंभाप्रसंगी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री ना. पांडुरंग फुंडकर हे होते. व्यासपीठावर खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, आ. संजय कुटे, आ.अँड. आकाश फुंडकर, माजी आ. तोताराम कायंदे, माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुकाअ षण्मुखराजन एस., विनोद वाघ, जि.प. सदस्य सरस्वती वाघ, राजेश लोखंडे, ज्योती खेडेकर यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या, की मुलींना जन्म घेण्याचा अधिकार नाकारल्या जात आहे. मुलगी कधीही आई-वडिलांना अंतर देत नाही, मग आपण का त्यांना नाकारतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या मातेच्या उदरात मुलगी असते, ती माता अश्रू ढाळते, ही प्रवृत्ती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली. या योजनेचा लाभ म्हणजे एका मुलीवर कुटुंब नियोजन करेल, त्या मुलीच्या नावे ५0 हजार रुपये डिपॉझिट करण्यात येतील. दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणार्‍याला त्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी २५-२५ हजार रुपये टाकण्यात येतील. त्या पैशांच्या व्याजावर मुलीचे संगोपन, शिक्षण, आरोग्य यावर खर्च केले जातील. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. त्याच धर्तीवर भाग्यश्री योजना सुरू केली. ग्रामविकास या योजनेबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील रस्ते एवढे खराब आहेत, की २५-२५ वर्षे या रस्त्याकडे कोणी पाहिले नाही. ग्रामविकास योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ११४ कोटींची कामे मंजूर करण्यात आली.  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३0 हजार कि.मी. रस्त्याचे काम येत्या पाच वर्षांत पूर्ण करणार आहोत. माझ्या खात्याचा कणा अंगणवाडी सेविका आहे. त्यांच्या मानधनात वाढ करून २८0 कोटींचा बोजा वाढला आहे. येत्या अधिवेशनात ३८0 कोटी वाढीव बजेट मंजूर करून त्यांची भाऊबीज ही दुपटीने वाढणार आहे. संघर्ष यात्रेचा शुभारंभ जिजाऊ मातेचे दर्शन घेऊन याच नगरीतून केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात परिवर्तन झाले. पाच वर्षांत महाराष्ट्राचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी दिला. सर्वप्रथम ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते माझी कन्या भाग्यश्री या रथाची फीत कापून शुभारंभ केला. ही रथयात्रा सिंदखेडराजा ते चोंढीपर्यंत आणि नायगावपर्यंत जाणार आहे.- 

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSindkhed Rajaसिंदखेड राजा