शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक महिलेत नेतृत्वक्षमता- सिंधुताई सपकाळ

By admin | Updated: April 13, 2017 01:21 IST

मलकापूर- आज प्रत्येक महिलेत कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची कुवत निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अनाथांच्या मायी डॉ.सिंधूताई सपकाळ यांनी केले.

मलकापूर : प्रतिकुल व खडतर परिस्थितीतही महिलांनी न डगमगता कणखर बाण्याने वागले पाहिजे. प्रत्येक महिला ही माता सावित्रीची लेक असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ तिच्यात आहे अन् हे बळच प्रत्येकीत सावित्रीबाई फुलेंच्या शैक्षणिक लढ्यातून उभे राहिले आहे. त्यांच्या लढ्यामुळेच आज प्रत्येक महिलेत कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची कुवत निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अनाथांच्या मायी डॉ.सिंधूताई सपकाळ यांनी केले.महात्मा जोतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त शहरातील स्वामी विवेकानंद आश्रम येथे डॉ.सिंधूताई सपकाळ संस्कारक्षम व्याख्यान अंतर्गत संबोधित होत्या. व्याख्यानपूर्वी बहुजन उद्धारक सेवा समितीच्यावतीने महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी महामानवांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. या शोभायात्रेत भजनी मंडळ व विश्व हिंदू परिषद संचालीत रणरागिणी महिला ढोल पथक सहभागी झाले होते. यानंतर सायंकाळी ७ वाजता डॉ.सिंधूताई सपकाळ यांच्या व्याख्यानाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान त्यांनी महिलांना मार्गदर्शन करीत समाजजीवनातील विविध पैलुंवर प्रकाश टाकीत मनात आणलं तर महिला काहीही करु शकतात अन् हे केवळ आत्मविश्वासावरच निर्भर आहे, असे स्फुरणदायी मार्गदर्शन त्यांनी केले.याप्रसंगी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळीसह माता व भगिनी उपस्थित होत्या.