शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

सासरच्यांनी नाकारलेल्या ‘लक्ष्मी’ने काढली चक्क बसस्थानकावर लक्ष्मीपूजनाची रात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 7:37 AM

नवविवाहितेचा पहिला दिवाळ सण अंधारात

- अनिल गवईखामगाव (जि. बुलडाणा) : अंतर्गत कलहामुळे गत साडेचार महिन्यांपासून माहेरी आलेली एक विवाहिता सर्व मतभेद विसरून सासरी आली. सणासुदीत सर्वकाही सुरळीत होईल या अपेक्षेने माहेरचा रोष ओढवून सासरी आलेल्या त्या विवाहितेला ऐन दीपावलीच्या दिवशी गृहप्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे पदरी निराशा आलेल्या विवाहितेला लक्ष्मीपूजनाची रात्र चक्क खामगाव बसस्थानकावर काढावी लागली. 

अकोला येथील हरिहरपेठ माहेर असलेल्या एका विवाहितेचा सासरच्यांशी गत साडेचार महिन्यांपासून वाद आहे. सासरी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने साडेचार महिन्यांपासून ती माहेरीच राहते. मध्यस्थांमार्फत तोडगाही काढण्यात आला. पहिला दिवाळसण असल्यामुळे ती शिवाजीनगर पोलीस स्टेशनअंतर्गत घाटपुरी नाका परिसरातील सासरी पोहोचली. मात्र, तिथे सासू-सासऱ्यांसह पतीनेही मागील वाद उकरून काढत  विवाहितेला ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिला गृहप्रवेश नाकारला.

घरच्यांनी प्रवेश नाकारल्यानंतर ती विवाहिता सुरुवातीला पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे अपेक्षित न्याय न मिळाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे गेली. मात्र, मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर एकटीच बसस्थानकावर थांबली. ही बाब माहेरी माहिती पडल्यानंतर उत्तररात्री नात्यातील एक मावशी नवविवाहितेच्या मदतीला धावली.

‘एसडीपीओ’कडूनही निराशाच पदरी

शिवाजीनगर पोलिसांनी योग्य ते सहकार्य न केल्याचे सांगत पीडित विवाहिता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पोहोचली. मात्र, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडे विचारणा केली. तक्रार दाखल नसल्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून संबंधित विवाहितेची समजूत काढण्यात आली.

पोलीस आणि भावानेही सोडली साथ

विवाहितेला सासरी तिच्या दारापर्यंत भावाने आणून सोडले. सासरचे घरात घेत नसल्याचे समजताच बहिणीसोबत तो शिवाजीनगर पोलीस स्टेशनपर्यंत गेला. दोन्ही भावंडांनी पोलिसांकडे आपबीती कथन केली. पोलीस संरक्षणात बहिणीला तिच्या सासरी सोडण्याची विनंती केली. पोलिसांनी त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले; परंतु विवाहितेला घरी सोडण्यासाठी असमर्थता दर्शविली. पोलिसांचे म्हणणे ऐकल्यानंतर भाऊदेखील माघारी परतला. त्यानंतर पुन्हा विवाहिता एकटीच तिच्या सासरी गेली. मात्र, परत तिला प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर ती बसस्थानकावर पोहोचली.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसDiwaliदिवाळी 2021