कोरेगाव भीमा येथील घटनेचे खामगावात पडसाद; राष्ट्रीय महामार्गावर एसटीबस फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:35 IST2018-01-02T12:53:33+5:302018-01-03T01:35:26+5:30

खामगाव: पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून उफाळलेल्या घटनेत एकाच्या मृत्यूचे  पडसाद खामगाव तालुक्यात उमटले.

Koregaon Bhima incident: ST bus stone pelting on National Highway | कोरेगाव भीमा येथील घटनेचे खामगावात पडसाद; राष्ट्रीय महामार्गावर एसटीबस फोडली

कोरेगाव भीमा येथील घटनेचे खामगावात पडसाद; राष्ट्रीय महामार्गावर एसटीबस फोडली

ठळक मुद्देया घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री गवळी येथे एका एसटी बसवर दगडफेक करण्यात आली.दगडफेक झाली त्यावेळी बसमध्ये २६ प्रवासी तसेच चालक आणि वाहक प्रवास करीत होते.या प्रकरणी चालकाने खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे.

खामगाव: पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून उफाळलेल्या घटनेत एकाच्या मृत्यूचे  पडसाद खामगाव तालुक्यात उमटले. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री गवळी येथे एका एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान, झालेल्या दगडफेकीत एकाचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच मराठवाड्यात तीव्र पडसाद उमटले. दरम्यान, मंगळवारी सकाळी १० वाजताच्या पिंप्री गवळी येथे संतप्त जमावाने एमएच-१४ बीटी -३२७४ या अकोला-नाशिक या बसवर दगडफेक केली. दगडफेक झाली त्यावेळी बसमध्ये २६ प्रवासी तसेच चालक आणि वाहक प्रवास करीत होते. या प्रकरणी चालकाने खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. दरम्यान, बसमधील प्रवासी सुखरूप असून एसटीबस खामगाव ग्रामीण पोलिसस्टेशन जमा करण्यात आली आहे.
 

Web Title: Koregaon Bhima incident: ST bus stone pelting on National Highway