कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 03:10 PM2019-12-01T15:10:27+5:302019-12-01T15:10:34+5:30

लघू सिंचन विभागातर्फे कोल्हापुरी बंधारे उभारले जातात. मात्र, त्याची वेळीच डागडुजी करणे, नवीन बरगे बसवणे, सडलेले बरगे काढणे ही कामे होताना दिसून येत नाहीत.

Kolhapuri dam repairing not done in Buldhana District | कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर!

कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर!

Next

- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या दुरूस्तीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामध्ये तीन ते चार बंधाºयांची स्थिती गंभीर आहे. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या बंधाºयांच्या कामांना सुद्धा अद्याप मुहूर्त मिळाला नाही. कथीतस्तरावर पुढील आठवड्यामध्ये सिंचन विभागाची बैठक असून, त्यामध्ये बंधाºयांच्या मोठ्या कामांवर कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढविण्याच्या अनुषंगाने कोल्हापुरी बंधाºयांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक बंधारे हे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात आहेत. गेल्या पाच वर्षात या तालुक्यात सुमारे ६८ कोल्हापुरी बंधारे मंजूर झाले. तर पातळ गंगा नदीवर दहा कोल्हापुरी बंधारे व या नदीच्या उपनद्यावर १३ बंधारे झाले आहेत. पाताळगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाºयावर गेट बसवून पाणी आडवण्याची मागणी शेतकºयांमधून अनेक दिवसांपासून होत असतानाही याकडे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पैनगंगासह इतर नद्या व उपनद्यावरही कोल्हापूरी बंधारे उभारण्यात आलेले आहेत. परंतू काही बांधाचे पाणी वाहून जाणे आणि पाण्याचा योग्य वापर न होणे, असे प्रकार वारंवार होत आहेत. कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. त्यातून लघू सिंचन विभागातर्फे कोल्हापुरी बंधारे उभारले जातात. मात्र, त्याची वेळीच डागडुजी करणे, नवीन बरगे बसवणे, सडलेले बरगे काढणे ही कामे होताना दिसून येत नाहीत. अतिवृष्टीमध्ये बंधाºयाला मोठा फटका बसला. त्या कामांना अद्याप सुरूवात झालेली दिसत नाही. गंभीर स्थिती असलेल्या तीन ते चार कोल्हापूरी बंधाºयाच्या ठिकाणी दुरुस्तीची यंत्रणा पोहचू शकत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अतिवृष्टीचा बंधाºयांना मोठा फटका
यावर्षी अतिवृष्टीमुळे बंधारे फुटण्याचे अनेक प्रकार समोर आले. चिखली तालुक्यातील सवणा येथील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारा बाजुने फुटल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. २०१७-१८ मध्येच ११ लाख २४ हजार रुपये खर्च करून या बंधाºयाच्या दुरुस्ती करण्यात आली होती. देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस बु. येथील कोल्हापूरी बंधाºयाला पुराच्या पाण्यामुळे भगदाड पडून बंधाºयाचे नुकसान झाले.
किरकोळ दुरूस्तीवरच भर!
सिंचन विभागाकडून कोल्हापूरी बंधाºयात पावसाने अडकलेला कचरा काढणे व इतर किरकोळ दुरूस्तीवरच भर देण्यात आलेला दिसून येत आहे. कोल्हापुरी बंधाºयांमध्ये पाणी साठवण्यासाठी लोखंडी बरगे असतात. ते काही ठिकाणी बसविण्यात आलेले नाहीत. बंधाºयांमध्ये गेट टाकल्यास पाणी अडू शकते. रब्बी हंगामात होणाºया सिंचनाच्या अनुषंगाने कोल्हापुरी बंधाºयाची ही कामे तातडीने होणे आवश्यक आहे.


तीन ते चार ठिकाणी आऊटलाईन झालेले आहे. त्यावर उपाययोजना सुरू आहेत. परंतू पाणी जास्त आणि शेतात पीके असल्याने सध्या काही करता येत नाही. बंधाºयाच्या ठिकाणी वाहन व इतर व्यवस्था पोहचू शकेल, त्याठिकाणी शक्य तितक्या लवकर कामे पूर्ण करण्यात येतील. पावसाने ज्या-ज्याठिकाणी कचरा अडकला होता, तो काढण्यात आला. इतर किरकोळ दुरूस्ती सुद्धा झालेली आहे.
- पवन पाटील, कार्यकारी अभियंता,
सिंचन विभाग, जि. प. बुलडाणा.

Web Title: Kolhapuri dam repairing not done in Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.