शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी मुलांचा ऑनलाइन किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 11:27 IST

Kids online chat on the school's first day : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शाळा ऑनलाइनच सुरू करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात २८ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली आहे. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शाळाऑनलाइनच सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेची घंटा वाजली परंतू शिक्षकांसाठीच. पहिल्या दिवशी मुलांचा किलबिलाट ऑनलाइनवरच ऐकायला मिळाला. कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील संपूर्ण शैक्षणिक सत्र ऑनलाइनच झाले. त्यामुळे यंदा मुलांना शाळा सुरू होण्याची अपेक्षा होती. परंतू कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता, यंदाही शाळा ऑनलाइनच सुरू करण्यात आल्या आहेत. २८ जून रोजी सकाळीच दरवर्षीप्रमाणे शाळा भरली. परंतू यावेळी विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन घेण्यात आली.   पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे  ऑनलाइनच स्वागत करण्यात आले. आदिवासी बहुल गावात पोहचले अधिकारीशाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण विभागाचे अधिकारी अनेक शाळांना भेट देतात. परंतू यंदा ऑनलाइन शिक्षण असल्याने शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जळगाव जामोद तालुक्यातील चारबन या आदिवासी बहुल गावात जाऊन शाळेला भेट दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शाळा प्रवेशोत्सव पार पडला. तर प्राथमिक स्तरावर काही मोजक्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचे स्वागतही करण्यात आले.

मॅडम मला बोलायचे...जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष मुलांना बोलते केले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी मुलांनीही मॅडम मला बोलायचे... असे म्हणून शाळेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला.

प्रवेशोत्सव साजराशिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या उपस्थितीत चारबन येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा व्यवस्थापन समिती व काही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गट शिक्षणाधिकारी फाळके, शिक्षण विस्तार अधिकारी रा. पा. तायडे, केंद्रप्रमुख के. जी. राऊत, शिक्षक दांडगे, दीपक उमाळे, एम. जी. मोसंबे, ममता बावित, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाबसिंग सस्त्या, कमिस चंगळ, उदयसिंग सस्त्या, थापासिंग पटेल, प्रकाश धुर्डे, शमीम देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाonlineऑनलाइन