खारपाणपट्टा जाणीव जागृती अभियान
By Admin | Updated: August 19, 2014 22:40 IST2014-08-19T22:40:34+5:302014-08-19T22:40:34+5:30
२१ ऑगस्टपासून खारपाणपट्टा विशेष जाणीव जागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

खारपाणपट्टा जाणीव जागृती अभियान
बुलडाणा : जिल्ह्यात खारपाणपट्टयाखाली १६0 गावे आहेत. तेथे लोकांमध्ये मुतखड्याचे प्रमाणे जास्त आढळते. खार्या पाण्यामुळे होणार्या आजारांना लोक बळी पडू नयेत यासाठी २१ ऑगस्टपासून खारपाणपट्टा विशेष जाणीव जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरूवात मेळाव्याने होणार आहे. मेळाव्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महादेव माळी हे लाभणार आहेत.
मेळावा गुरूवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता भगीरथ मंगल कार्यालय, खामगाव रोड, एचडीएफसी बँकेच्या बाजूला शेगाव येथे होणार आहे. सदर मेळाव्यासाठी या १६0 गावातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. या अभियानाचे आयोजक उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग विलास पुजारी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली जी.एस.घाईट, संदीप सुखधान, शरद ठाकूर, ज्ञानेश्वर वाकोडे, संतोष साखरे, समीर बेग, संदीप पाटील, सचिन जाधव, ङ्म्रीमती मनिषा शेजव, ङ्म्रीमती प्रणिता अंभोरे, किरण शेजोळे, सागर कल्याणकर यांनी केले.