शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

बुलडाणा जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:09 PM

आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ४४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत ६६.३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर पेण्यांचे नियोजन केले आहे. चार लाख ९६ हजार ४४१ हेक्टवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ४४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर कृषी विभागाचे पेरण्याचे नियोजन असून आतापर्यंत ६६.३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. दरम्यान, बुलडाणा तालुक्यात पावसाचा जोर सातत्यपूर्ण असल्याने या तालुक्यातील जवळपास २८ टक्के पेरण्या पावसामुळे रखडल्याचे चित्र आहे.कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर पेण्यांचे नियोजन केले आहे. त्यानुषंगाने विचार करता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चार लाख ९६ हजार ४४१ हेक्टवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. यात प्रामुख्याने कापसाचा पेरा हा एक लाख ४६ हजार ४१३ हेक्टरवर झाला असून सोयाबीनचा पेरा दोन लाख ४९ हजार ४०२ हेक्टरवर झाला आहे. एकुण सरासरी क्षेत्राच्या ३३.३० टक्के हा पेरा झाला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन व कपाशीच्या पेºयाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.दुसरीकडे जिल्ह्यात जून महिन्यात तब्बल २० ते २२ दिवस पावसाने ओढ दिली होती. दुष्काळी स्थितीत ही स्थिती अधिकच दाहकता निर्माण करणारी होती. मात्र त्यानंतर २३ जून पासून जिल्ह्यात पावसाने संततधार हजेरी लावली. परिणामी प्रारंभी शेतकºयांना पेरण्या करणेही अवघड झाले होते. त्यातच बुलडाणा तालुक्यातील धाड, देऊळघाट, सागवन, कोलवड, तांदुळवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे नुकसान झाले होते. त्यातच या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अद्यापही बुलडाणा तालुक्यातील २८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या मात्र रखडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यास या तालुक्यात राहिलेल्या पेरण्या पूर्ण होऊ शकतात. 

बुलडाण्याची पावसाचीसरासरी ४९ टक्के४बुलडाणा तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४९ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात दररोज संततधार पावसाची हजेरी लागत असल्याने जवळपास २८ टक्के पेरण्या त्यामुळे रखडल्या आहेत. बुलडाणा तालुक्यात सरासरी ७५ हजार ५०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार ३८८ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३२ टक्के पाऊस पडला आहे.७५ हजार हेक्टरवर कडधान्याचा पेराजिल्ह्यात दोन लाख ८७ हजार ६०५ हेक्टरवर कडधान्य पेºयाचे नियोजन कृषी विभागाने केले होते. त्यापैकी आतापर्यंत ९९ हजार ५०५ हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे. यात ४९ हजार ७०८ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असून उडीदाचा पेरा हा ११ हजार ७२६ हेक्टरवर झालेला आहे. दरम्यान तेलबियांचा पेरा हा दोन लाख ५० हजार ४२३ हेक्टरवर करण्यात आलेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी