खामगाव : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 14:54 IST2021-05-31T14:51:08+5:302021-05-31T14:54:15+5:30

Accident News: चिखली मार्गावरील अपघातात नांदुरा येथील कंत्राटदार सुभाष मोहता ठार.

Khamgaon: Three killed in two separate road accidents | खामगाव : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू

खामगाव : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव आणि परिसरात झालेल्या तिन वेगवेगळ्या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी झालेल्या दोन रस्ता अपघातात दोघे दुचाकी स्वार ठार झाले. तर नांदुरा येथील प्रसिध्द कंत्राटदार सुभाष मोहता यांच्यावर सोमवारी दुपारी गणेशपूर नजीक काळाने घातला.
-खामगाव-रोडवरील बाळापूर फैल भागात सुटाळपुरा येथील सुनिल सारंगधर चेंडाळणे यांच्या दुचाकीला रविवारी सायंकाळी एका मालवाहू वाहनाने धडक दिली. या धडकेत चेंडाळणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोमवारी सकाळी खामगाव-शेगाव रोडवरील वरखेड फाट्या नजीक विश्वास नेमाडे नामक इसमाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. यात नेमाडे यांचा मृत्यू झाला. या वाहनाच्या धडकेतून खामगाव नगर पालिकेतील एक कर्मचारी बालंबाल बचावला. त्याचवेळी नांदुरा येथील प्रसिध्द कंत्राटदार सुभाष मोहता आपल्या श्रेयस नामक मुलासोबत चिखली येथून खामगावकडे येत असताना गणेशपूर नजीक त्यांच्या कारला अपघात झाला. या भीषण अपघातात सुभाष मोहता जागीच ठार झाले. तर त्यांचा श्रेयस मोहता नामक मुलगा गंभीर जखमी झाला. श्रेयस मोहता यांच्यावर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Web Title: Khamgaon: Three killed in two separate road accidents