व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले; ७ तासात लावला गुन्ह्याचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:11 IST2019-03-29T12:10:47+5:302019-03-29T12:11:52+5:30

खामगाव : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. घटनेच्या अवघ्या ७ तासात शहर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. 

Khamgaon police caught the robbers in 7 hours | व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले; ७ तासात लावला गुन्ह्याचा छडा

व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले; ७ तासात लावला गुन्ह्याचा छडा

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. घटनेच्या अवघ्या ७ तासात शहर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. 
शहरातील त्रिलोक कृपालदास लखानी हे आपले स्वीट मार्ट बंद करून घरी जात होते.  दरम्यान, नॅशनल शाळेच्या बाजूला तिघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली.  त्यानंतर मोटार सायकलीवरून खाली पडले. तितक्यात खाली  अज्ञात युवकांनी त्यांच्या हातातली पैशाची बॅग घेऊन फरार झाले. त्यात जवळपास ७० ते ८० हजार रुपये रोख रक्कम व दहा ते वीस हजार रुपयांचे मोबाईल रिचार्ज वाउचर होते. त्यानंतर शहर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून घटनेचा छडा लावला.  तिघांना ताब्यात घेतले.  यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. अप्पर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व एसडीपीओ  पथकाने ही संयुक्त कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, शहर पोलिस निरीक्षक संतोष ताले उपस्थित होते.

Web Title: Khamgaon police caught the robbers in 7 hours