शहरं
Join us  
Trending Stories
1
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
2
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
3
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
4
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
5
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
6
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
7
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
8
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
9
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
10
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
11
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
12
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत
13
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
14
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
15
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
16
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
17
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
18
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
19
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
20
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर

खामगाव-जालना महामार्गाचे काम संथगतीने; नागरिकांनी केले  ‘रास्ता रोको’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 2:11 PM

मेहकर फाटा ते खामगाव चौफुलीपर्यंतचा रस्ता खोदून ठेवला असून त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने रहदारी जिकरीची झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खामगांव-जालना या महामार्गाचे गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. याअंतर्गत शहरातील मेहकर फाटा ते खामगाव चौफुलीपर्यंतचा रस्ता खोदून ठेवला असून त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याने रहदारी जिकरीची झाली आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील नागरिकांनी २९ जुलै रोजी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.रस्ता चौपदीकरणाच्या कामासाठी खामगाव-जालना हा महामार्ग ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे. मात्र, या मार्गाचे अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने हा मृत्यूचा महामार्ग म्हणून कुपरिचीत झाला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र रस्तेजोड प्रकल्प कार्यान्वीत होत असताना खामगांव-जालना महामार्गाचे रखडलेले काम तिसऱ्यावेळी जाणत्या सरकारच्या काळात झपाट्याने परिपूर्ण होत आहे, मात्र काही अर्थपुर्ण बाबींच्या आड खामगांव चौफुली ते मेहकर फाटा पर्यंतच्या रस्त्याचे काम काही दिवसांपासून थांबविण्यात आले होते. सर्वतोपरी सहकार्याच्या भूमिकेतून फेब्रुवारीपासून या रस्त्याचे काम पुन्हा पुर्ववत सुरु करण्यात आले, परंतु कधी तांत्रीक बाबींमुळे तर कधी अपुºया मनुष्यबळामुळे या रस्त्याचे काम अगदी कासवगतीने सुरु आहे. उखडलेला रस्ता आणि त्यातच पावसाची संततधार या मुळे रस्त्यावर चिखलाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीस प्रचंड प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. लहानमोठी सर्वच वाहने स्लीप होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याची दखल घेत आंदोलनाची भूमिका घेत चिखली शहरातील नागरिकांसह भाजपचे युवा नेते कुणाल बोंद्रे व न. प. पदाधिकाऱ्यांनी २९ जुलै रोजी स्थानिक रेणुका पेट्रोल पंपासमोर रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुध्दा यावेळी दिला. या आंदोलनात कुणाल बोंद्रे यांच्यासह शे.अनिस शे.बुढन, शैलेश बाहेती, सुरेश बोंद्रे, शहेज़ाद अली खान, न. प. गट नेते प्रा. डॉ. राजु गवई, न. प. सभापती नामदेव गुरूदासाणी, अनुप महाजन, सुदर्शन खरात, दत्ता सुसर, यांच्यासह स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, सुभाष देव्हडे, जय बोंद्रे, अप्पु गुप्ता, शे. इमरान, पप्पु राजपुत, विक्की शिनगारे, रवि देशमुख, किशोर कोईटे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीhighwayमहामार्गagitationआंदोलन