Join us  

"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 12:20 PM

Loksabha Election - उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर वादग्रस्त विधान केले. त्यावरून शिवसेनेनेही जोरदार पलटवार केला आहे.

मुंबई - Sanjay Nirupam on Priyanka Chaturvedi ( Marathi News ) मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय अशा शब्दात उबाठा गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी हल्लाबोल केला होता. शिंदे गद्दार आहे आणि गद्दारच राहणार असं चतुर्वेदी यांनी ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत विधान केले. त्यावरून आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करून म्हटलंय की, उबाठा गटाच्या महिला खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर अभद्र टिप्पणी केली. जर त्यांनी केलेल्या विधानावर त्यांचा विश्वास असेल तर आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहायला हवं "मेरा बाप महागद्दार है..." कारण गद्दारी तर त्यांनी भाजपासोबत युती तोडून केली असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय महागद्दारी आदित्यच्या वडिलांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजलि देऊन केली, ज्या काँग्रेसविरोधात आयुष्यभर त्यांनी विचार मांडले. त्या काँग्रेसशी हातमिळवणी केली. या महागद्दारीबद्दल उबाठाला झोंबतं का असा सवालही संजय निरुपम यांनी प्रियंका चर्तुवेदी यांना विचारला आहे.

काय म्हणाल्या होत्या प्रियंका चतुर्वेदी?

बुधवारी संध्याकाळी ईशान्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, गद्दार हे गद्दारच राहणार, एक सिनेमा आला होता, दिवार..ज्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या हातावर लिहिलं होते, मेरा बाप चोर है, मात्र गद्दार हे यांच्या कपाळावर लिहिलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार है असं लिहिलं आहे असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :संजय निरुपमउद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई उत्तर पूर्वश्रीकांत शिंदे