शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खामगाव : काँग्रेसच्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 2:16 PM

शिवसेना व काँग्रेस उमेदवारांमध्ये अद्यापही संभ्रमावस्था कायम असल्याचे दिसून येते.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भाजपाच्या उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असताना शिवसेना व काँग्रेस उमेदवारांमध्ये अद्यापही संभ्रमावस्था कायम असल्याचे दिसून येते.काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकूल वासनिक यांनी बुलडाणा व मेहकर मतदारसंघातील उमेदवारी रविवारी संध्याकाळी जाहीर केली. यामध्ये घाटाखालील खामगाव, मलकापूर व जळगाव जामोद मतदारसंघातील उमेदवारीचा समावेश नव्हता. इच्छूक उमेदवारांसह कार्यकर्ते व मतदारांमध्येही ‘कोण असेल काँग्रेस उमेदवार’ याबाबत उत्कंठा लागली आहे.बुलडाण्यातून हर्षवर्धन सपकाळ तर मेहकरमधून अनंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाली. पहिल्या यादीत जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर होतील, अशी अपेक्षा होती; मात्र दोनच मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्या आहेत. सोशल मीडियावर उमेदवाराची यादी फिरत असतानाच अमुक याच उमेदवाराचे दुसऱ्या यादीत नाव आता असणार आहे, अशाप्रकारचे सुचनात्मक मॅजेसही फिरत होते. यामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. खामगाव, मलकापूर व जळगाव जामोद मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांपैकी काही अद्यापही दिल्लीत तळ ठोकून आहेत. जळगाव जामोद मतदारसंघात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्याविरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.सहकार नेते प्रसेनजीत पाटील व माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची कन्या डॉ. स्वाती वाकेकर या दोघांपैकी एकाला तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. खामगाव मतदारसंघात भाजपाचे अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष तेजेंद्रसिंग चौहान, अमरावती विभागीय समन्वयक धनंजय देशमुख यांनी तयारी दर्शवली आहे.मलकापूर मतदारसंघात मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिश रावळ व नांदुरा नगर विकास आघाडीचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. मलकापूर मतदारसंघात ना. चैनसुख संचेती यांच्यासारख्या मातब्बर नेत्याविरुद्ध निवडणूक लढविणे काँग्रेस उमेदवारांना आव्हानात्मक ठरणार आहे.शिवसेनेचे उमेदवारही तयारीतयुतीचा तिढा अद्याप कायम असल्याने मुंबईत शिवसेनेच्या बैठकीत जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनीही निवडणुकीची तयारी दर्शवली आहे. यामध्ये खामगाव मतदारसंघातून शिवसेना तालुकाप्रमुख अनिल अंमलकार, श्रीराम शेंगार, उमेश शेळके तर जळगाव जामोद मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, संपर्क प्रमुख दत्ता पाटील, संतोष घाटोळ, वासुदेव क्षीरसागर यांनीही निवडणुकीची तयारी दर्शवली आहे, तर मलकापूर मतदारसंघातून तालुकाप्रमुख विजय साठे व शिवसैनिक विजय गव्हाड हे सुद्धा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. उपजिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी यावेळेस निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवली आहे. प्रत्येक इच्छूक उमेदवाराने आपआपल्या परिने तयारी सुरु केली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcongressकाँग्रेस