पुस्तकांच्या ऑनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा! ई-बुकचा वाढतोय प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 08:14 PM2019-04-25T20:14:22+5:302019-04-25T20:14:57+5:30

ई-बुक वाचण्याकडेही आता अनेकांचा कल वाढला आहे. प्रत्येकाकडे सध्या मोबाईल असल्यामुळे अनेक जण त्याचा वाचणासाठी वापर करत आहे.

Keep the material in the online world of books! Increasing effect of e-books | पुस्तकांच्या ऑनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा! ई-बुकचा वाढतोय प्रभाव

पुस्तकांच्या ऑनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा! ई-बुकचा वाढतोय प्रभाव

googlenewsNext

बुलडाणा - ई-बुक वाचण्याकडेही आता अनेकांचा कल वाढला आहे. प्रत्येकाकडे सध्या मोबाईल असल्यामुळे अनेक जण त्याचा वाचणासाठी वापर करत आहे. वेगवेळी पुस्तके तथा प्रिंट आवृत्त्या नसलेल्या जुन्या कसदार कादंब-या वाचण्याकडे प्रामुख्याने हा कल दिसून येत आहे. पुस्तकांच्या आॅनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा चांगल्याप्रकरणे जपण्याचा प्रयत्न होत आहे. 

पुस्तकांची घटलेली मागणी लक्षात घेता वाचन संस्कृती धोक्यात आल्याचे बोलल्या जात आहे. इंटरनेटचे जाळे खेड्यापाड्यापर्यंत पोहले असल्याने प्रत्येक जण मोबाईलमध्येच व्यस्त दिसून येत आहे. वाचनाचा ट्रेंड बदलल्यामुळे हातात पुस्तक घेऊन दिवसभर वाचन करणारे वाचक आता अगदी बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहे. तसेच गं्रथालयात जावून कादंबºया वाचन करणे, मार्केटमध्ये नवीन पुस्तक येताच त्याची खरेदी करणे, हे प्रकार सध्या दुर्मीळ झाले आहेत. सर्व काही मोबाईलमध्ये आॅनलाइन उपलब्ध होत असल्याने पुस्तक विश्वही यात मागे राहिले नाही. वेगवेळ्या प्रकारचे पुस्तक, कथा, जुन्या कसदार कादंबºया आॅनलाइन उपलब्ध आहेत. कविता संग्रह, मराठीतील लेख, लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तके सर्वकाही आॅनलाइन उपलब्ध आहे. दरम्यान, याचा वापर मोबाईलवेडे चांगल्या प्रकारे करू शकतात.

ऑनलाइन साहित्य
पुस्तकांच्या विश्वात डोकावले असता आॅनलाइनवर पुस्तकांची यादी दिवंसेदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. कथा, कादंबरी, इतिहास, नाटक, भावबंध, वैचारिक, चरित्र, प्रवासवर्णन, दुर्ग दुर्घट भारी, विनोद, इत्यर्थ, कला, काव्य संग्रह, गझल, त्रिवेणी, बाल गोष्टी, बालगाणी, धार्मिक, ज्ञानेश्वरी, संगीत, संस्कृत, पाककला, खेळ, कृषी, मूर्ती कला, चित्रकला अशा वेगवेळ्या प्रकारातील पुस्तके सध्या आॅनलाइनवर आपल्याला वाचायला मिळातात. 
 
राज्य साहित्य आणि सांस्कृतीक मंडळ ऑनलाइन
महाराष्ट्राची भाषा,  संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाºया विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाग्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाग्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. या अनुषंगानेच मंडळाच्या वतीने ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 
 
ई-बूकला पुनर्मुद्रीत करण्यास निर्बंध
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती, स्कॅन करून मोफत डाऊनलोडकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली  आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील माहिती, सर्व ई-बूक व स्कॅन करून उपलब्ध करून देण्यात आलेली सर्व पुस्तके व त्यातील मजकूर मंडळाच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी पुनर्मुद्रीत अथवा प्रकाशित करता येणार नाही किंवा त्याचा वापर करता येणार नसल्याचीही मंडळाकडून सक्त ताकीद देण्यात आलेली आहे.

Web Title: Keep the material in the online world of books! Increasing effect of e-books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.