शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

करडी तेलाच्या दराने गाठले द्विशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 3:13 PM

नवीन करडी बाजारात येण्यास आणखी दोन महिन्यांचा अवधी असल्याने करडी तेल २५० रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज तेल विक्रेत्यांनी व्यक्त केला.

- सोहम घाडगे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गतवर्षी दुष्काळामुळे करडीचा पेरा कमी झाल्याने उत्पादनात घट आली. त्याचा सरळ परिणाम करडी तेलाच्या भाववाढीवर झाला आहे. सध्या करडी तेल २२० रुपये लिटरने विक्री होत आहे. नवीन करडी बाजारात येण्यास आणखी दोन महिन्यांचा अवधी असल्याने करडी तेल २५० रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज तेल विक्रेत्यांनी व्यक्त केला.खाद्यतेल हा स्वयंपाकातील महत्वाचा पदार्थ आहे. किचनमध्ये तेलाच्या कॅटलीस वेगळीच जागा असते. कमी प्रमाणात का होईना मात्र प्रत्येक घरात तेलाचा वापर होतोच. भाजी असो वा खाण्यातील अनेक पदार्थ तेलाशिवाय बनत नाहीत. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले की, त्याचा परिणाम गृहिणींच्या बजेटवर होतो. यावर्षी खाद्यतेलाचे भाव नवनवीन उच्चांक गाठत आहेत. खाण्यात करडीचे तेल चांगले असते. करडी तेलाच्या सुगंधावरुनच त्याची पारख होते. सध्या करडी तेल २२० रुपये लिटरने विक्री होत आहे. पामतेल, सोयाबीन, शेंगदाणा व सरकी तेलाचेही दर वाढले आहेत. खरीप हंगामात पिकांना बसलेला फटका व विदेशी पामतेलाचा देशातील कमी झालेला साठा यामुळे महागाई वाढल्याचे बोलले जात आहे.दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नवीन करडी तेलाची आवक सुरु होते. मात्र मागील रब्बी हंगामात दुष्काळामुळे करडीचा पेरा कमी झाल्याने उत्पादन घटले. यंदा तब्बल साडेतीन महिने उशिराने करडी तेल बाजारात दाखल झाले. जून महिन्यापासून करडी तेलाच्या भाववाढीला सुरुवात झाली. दर महिन्याला करडी तेल नवीन उच्चांक गाठत आहे. करडी तेल महाग होत असून २२० रुपये लिटर विक्री होत आहे. नवीन करडी येण्यास आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे २५० रुपयांपर्यंत भाव जाऊन पोहोचेल, असा अंदाज व्रिकेत्यांनी व्यक्त केला.किरकोळ व्रिकीत आठवड्यात ५ रुपयांनी पामतेल महागले आहे. सध्या ८० रुपये लिटरने विक्री सुरु आहे. खरिपातील नवीन सोयाबीन १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान बाजारात येत असते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने फटका दिल्याने सोयाबीन खराब झाले आहे. दिवाळीपासून आजपर्यंत होलसेलमध्ये तेल ९ रुपयांनी महागले. सध्या सोयाबीन तेल ९९ रुपये तर शेंगदाणा तेलाचे भाव १५० रुपयांवर पोहोचले आहे.अलिकडील काळात करडी पिकाचा पेराही कमी झाला आहे. त्याचाही परिणाम या भाववाढीवर झालेला आहे. सातत्याने तेलाच्या किंमती वाढत असून कधी काळी शेंगदाण्याचे तेल सर्वात महाग गणल्या जात होते. मात्र आता त्याची जागा करडीच्या तेलाने घेतली आहे. ग्रामीण भागात आजही करडीचे तेल दैनंदिनस्तरावर स्वयंपाकघरात वापरण्यात येते. वाढलेल भाव पाहता स्वयंपाक घरातील फोडणीच्या तडक्याची किंमतही त्यामुळे वाढली आहे.

 

गतवर्षी दुष्काळामुळे कमी झालेला करडीचा पेरा व यावर्षी परतीच्या पावसाने खरिप पिकांचे झालेल्या नुकसानामुळे करडी, सोयाबीनची आवक घटली. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या. सध्या करडी तेल २२० रुपये, सोयाबीन ९९ तर शेंगदाणा १५० रुपये लिटरने विक्री सुरु आहे.- आदित्य कोठारीविक्रेता, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाbusinessव्यवसाय