एका रक्ताच्या उलटीनंतर संपला जीवनाचा प्रवास

By ब्रह्मानंद जाधव | Updated: June 26, 2023 18:04 IST2023-06-26T18:03:48+5:302023-06-26T18:04:04+5:30

धाड येथे संतोष गम्मा प्रसाद यांच्या सोबतच बिलास कुमार (वय ५०) हा मजूरीने काम करीत होता.

journey of life ended after one vomit of blood | एका रक्ताच्या उलटीनंतर संपला जीवनाचा प्रवास

एका रक्ताच्या उलटीनंतर संपला जीवनाचा प्रवास

बुलढाणा : तालुक्यातील धाड येथे कोल्ड स्टोरेजवर काम करणाऱ्या एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना २६ जून रोजी पहाटे उघडकीस आली. रात्री झोपेत एका रक्ताच्या उलटीनंतर या मजूराचा जीवनाचा प्रवास संपला आहे. संतोष गम्मा प्रसाद (वय २८, रा. हरिजनपूर, ता. फरीदा जि. महाराजगण, उत्तर प्रदेश) यांनी धाड पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. धाड येथे संतोष गम्मा प्रसाद यांच्या सोबतच बिलास कुमार (वय ५०) हा मजूरीने काम करीत होता.

 हा मागील तीन महिण्यापासून धाड येथे कोल्ड स्टोरेजवर मजुरीने काम करीत होता. दरम्यान, २५ जून रोजी रात्री ९ वाजता ते २६ जून रोजी पहाटे दरम्यान सोबत झोपलेले असताना बिलास कुमार यास अचानक रक्ताची उलटी झाली. त्यामध्येच बिलास कुमार यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी धाड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुरेश मोरे व पोलिस करीत आहेत. मृतक बिलास कुमार याचे संपूर्ण नाव व पत्ता माहीत नसल्याने सध्या पोलिस नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

Web Title: journey of life ended after one vomit of blood