Jijau janmotsav: Jijau Mahapooja on the palace | जिजाऊ जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर; राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा
जिजाऊ जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर; राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा

- काशिनाथ मेहेत्रे

सिंदखेड राजा - सूर्योदय समयी मंगलमय वाद्यात ढोलताशाच्या गजारात व फटाक्यांच्या अतिशबाजीमध्ये गुलालाची उधळण करीत मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाच्यावतीने १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ माँसाहेबांची महापूजा करुन जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. जिजाऊ माँसाहेबांच्या ४२१ व्या जंयतीनिमित्त जिजाऊ भक्तांनी सिदंखेड राजा नगरीत गर्दी केली होती.  

मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मस्थळ राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर १२ जानेवारी रोजी सूर्योदयापासूनच महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपऱ्यातून माँ जिजाऊचरणी लीन होऊन माँ साहेब जिजांऊचे आर्शीवाद घेण्यासाठी जनसागर उसळला होता. जिजाऊंच्या जन्मस्थळावर हार फुलांनी सजावट करण्यात येऊन विवध रांगोळी काढण्यात आल्या होत्या.

जिजाऊ माँ साहेब जिजाऊ, सावित्रीमाई, शिवजी महाराज यांच्या वेशभूषा करुन जिजाऊ भक्त राजवाड्यात दाखल झाले होते. सूर्योदयसमयी, मराठा सेवा संघाच्यावतीने प्रमुख दाम्पत्यांनी जिजाऊ पूजन केले. विजयकुमार घोगरे, जयश्री कामाजी पवारी, विणा लोखंडे, रेखा दत्तात्रय चव्हाण, वंदना मनोज आखरे, अर्चना सुभाष कोल्हे, किरण ठोसरे, ज्योती शिवाजी जाधव, अरुणा योगेश पाटील, लखुजीराव जाधव यांचे वंशज संगीताताई शिवाजी राजेजाधव यांनी सपत्निक तसेच राजुकाका राजे जाधव, संदीप राजे जाधव, प्राचार्य अरुण राजे जाधव यांनी पूजन केले. 

नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अ‍ॅड नाझेर काझी, उपनगराध्यक्ष सीमा मुरलीधर शेवाळे, मुख्याधिकारी एच. डी. वीर व त्यांच्या सर्व आजी माजी नगर अध्यक्ष तसेच नगरवेक व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे व त्यांनतर खासदार प्रतापराव जाधव, राजश्री जाधव सपत्निक, मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उषा खेडेकर, जालींदर बुधवत, ऋषीकेश जाधव, श्रीनिवास खेडेकर, अतीश तायडे, शिवप्रसाद ठाकरे, संजय मेहेत्रे यांनी अभिवादन केले.  तर भाराकाँचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, जयश्री शेळके, जगन ठाकरे, मनोज कायंदे, शहाजी चौधरी यांनी अभिवादन केले. पालक मंत्री मदन येरावार, आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार तोताराम कायंदे, विनोद वाघ, शाम जाधव, सुनिल कायंदे, सरस्वती वाघ, अभिनेते अमोल कोल्हे यांनी जिजाऊंना अभिवादन केले. 


जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यावतीने अभिवादन
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, उपाध्यक्षा मंगलाताई रायपुरे यांच्यासह जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी षन्मुखराजन, राजेश ठोके, संर्वगविकास अधिकारी विठ्ठल जाधव व सर्व जिल्हा परिषद व पंचायत समीती सदस्यांनी अभिवादन केले.

 

Web Title: Jijau janmotsav: Jijau Mahapooja on the palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.