जिगाव पूनर्वसन; १९ गावांची झाली स्थळ निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:03 PM2019-08-17T13:03:27+5:302019-08-17T13:03:38+5:30

१७ गावांच्या पूनर्वसनासाठी स्थळ निश्चिती झाली असून या खरकुंडी गावासाठीच्या पूनर्वसनाचे काम जवळपास १०० टक्के पूर्ण झाले आहे.

Jigaon Punarvasan; Determination of site location of 19 villages | जिगाव पूनर्वसन; १९ गावांची झाली स्थळ निश्चिती

जिगाव पूनर्वसन; १९ गावांची झाली स्थळ निश्चिती

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पामध्ये पुर्णत: तथा अंशत- ४७ गावांच्या पूनर्वसनाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १९ गावांचे पूनर्वसन करण्यात येत असून त्यापैकी १७ गावांच्या पूनर्वसनासाठी स्थळ निश्चिती झाली असून या खरकुंडी गावासाठीच्या पूनर्वसनाचे काम जवळपास १०० टक्के पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तींचे पूनर्वसन अधिनियम १९९९ च्या कायद्यातंर्गत ही कामे सुरू असून या पूनर्वसित गावठाणामध्ये एकुण १८ नागरी सुविधा पुरवाव्या लागणार आहेत.
या प्रकल्पामुळे ३२ गावे पूर्णत: तर १५ गावे अंशत: बाधीत होत आहेत. त्यानुषंगाने एकुण पाच टप्प्यात भूसंपादनासह अनुषंगीक कामे करण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील पूनर्वसनाच्या अनुषंगाने १९ गावांपैकी १७ गावांसाठीची स्थळ निश्चिती पूर्णत्वास गेली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमध्ये समाविष्ट असलेल्या जिगाव प्रकल्पाचे सध्याच्या घडीला ६० टक्के काम पूर्ण झाले असून २०२१ पर्यंत या प्रकल्पामध्ये अंशत- १०४ दलघमी पाणी साठवण्याचे उदिष्ट ठरविण्यात आलेले असून जवळपास १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर जिल्ह्यात एक लाख एक हजार ८८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा निर्माण होऊन बुलडाणा जिल्ह्याची पाणीसाठवण क्षमता ही जवळपास ३६ टीएमसीच्या आसपास पोहोचेल. सोबतच प्रकल्पाचा लाभ हा बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील २८७ गावांना होणार असून या प्रकल्पामुळे जवळपास २७ हजार ६०० ऐवढी लोकसंख्या पूनर्वसित करावी लागणार आहे. त्यादृष्टीने हाता भूसंपादनाच्या प्रक्रियेपासून पूनर्वसनाच्या प्रक्रियेने काहीसा वेग पकडला असल्याचे जिल्हा पूनर्वसन विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, २०१४ पासून प्रकल्पासाठीचे आणि पूनर्वसनासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. अन्य गावांच्या पूनर्वसनाचीही प्रक्रिया सुर आहे.


आठ हजार कुटुंबे प्रभावीत
या प्रकल्पामुळे पूर्णत: बाधीत गावातील सात हजार ५९२ तर अंशत: बाधीत गावातील ४३२ कुटुंबे प्रभावीत होणार आहेत. दरम्यान त्यांच्या पूनर्वसनाच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील १९ गावांसाठीच्या जागांची स्थळ निश्चिती झाली असून खरकुंडीचे पूनर्वसन हे नांदुरा तालुक्यातील आलमपूर येथे करण्यात येत असून येथील भूसंपादन, नागरी सुविधांची कामे ही १०० टक्के पूर्णत्वास गेली असल्याचे जिल्हा पूनर्वसन विभागाचा अहवाल स्पष्ट करतो. त्यानंतर कोदरखेड, जिगाव, टाकळी वतपाळ, पलसोडा या गावांच्या पूनर्वसनाच्या दृष्टीने गावठाणांची पुनर्वसित गावठाणाची अनुक्रमे दहिगाव, नांदुरा बुद्रूक, मोमीनाबाद, पलसोडा, रामपूर येथील नागरी सुविधा तथा नवीन गावठाणाच्या भूसंपादनाची कामे ९८ टक्के ते ८० टक्क्या दरम्यान पूर्ण झाली आहेत.

Web Title: Jigaon Punarvasan; Determination of site location of 19 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.