शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

आवडीच्या क्षेत्राची निवड करणे महत्वाचे - प्रांजली  कंझारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 4:36 PM

माझ्या इथवरच्या प्रवासात हेच महत्वाचे ठरले, असे मत ‘बबन’ चित्रपटातून चर्चेत आलेली नवोदित अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने बोलताना व्यक्त केले.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आपल्याला जे आवडते, त्याचीच निवड करणे सर्वात महत्वाचे आहे. बरेचदा आवडीविरूध्द क्षेत्र निवडल्याने आयुष्यात गोंधळ उडतो. त्यामुळे आवडीचे क्षेत्र निवडण्याचे धैर्य आणि त्याला कुटूंबियांचीही तितकीच साथ; यावरच यश अवलंबून असते. माझ्या इथवरच्या प्रवासात हेच महत्वाचे ठरले, असे मत ‘बबन’ चित्रपटातून चर्चेत आलेली नवोदित अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने बोलताना व्यक्त केले.

अभिनय या क्षेत्राकडे कश्या वळल्या?लहानपणापासूनच मला नाटकात काम करायची सवय होती. शाळेमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रम हा माझ्या आवडीचा विषय होता. तेव्हापासून टीव्हीवर दिसणाऱ्या नट्या आकर्षित करायच्या. आपणही टीव्हीवर दिसावे, असे सारखे वाटायचे. तोच ध्यास शेवटी सत्यात उतरला.

अभिनय करण्याची संधी केव्हा मिळाली?मुळात मी इंजिनिअरिंग करायला पुण्यात आले. बीई करीत असताना सन २०१६ मध्ये सेंकड इअरमधे होते. त्याचवेळी पुण्यात ‘बबन’ चित्रपटसाठी आॅडिशन सुरू होते. त्यात मी सहभागी झाले, आणि माझी निवड झाली. डिसेंबर २०१६ मध्ये हे आॅडिशन झाले आणि त्यानंतर २४ फेब्रुवारी २०१७ ला पहिल्यांदा प्रत्यक्ष सेटवर अभिनय करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून हा प्रवास सुरूच आहे.

नाटकांच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?ती पहिली रात्र, कुर्यात सदा टिंगलम ही महत्वाची दोन नाटके आहेत. यासह इतरही अनेक छोट्या नाटकांमध्ये मी काम केले. परंतु जेव्हा बबन हा चित्रपट २३ मार्च २०१८ मध्ये दिग्दर्शीत झाला, तेव्हाच खरी माझी ओळख झाली. मुख्य नायिकेच्या मैत्रिणीचा रोल मला मिळाला. मी त्या भुमिकेला पुर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच खºया अर्थाने मला ग्लॅमर प्राप्त झाले. सध्या आणखी दोन नवीन चित्रपटात काम करायचे आहे. फेब्रुवारीमध्ये त्याचे काम सुरू होईल.नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल?संयम सर्वात महत्वाचा आहे. अभिनय क्षेत्रात सातत्याने स्पर्धा राहते, ती टिकून राहण्याची. काही वर्षांआधी मोठे नाव कमविलेल्या अनेक अभिनेत्री सध्या पडद्यावर दिसत नाहीत. ही अवस्थाच सगळ्यात आव्हानात्मक आहे. त्यामुळे मिळेत त्या परिस्थिती मिळेल ते काम करण्याची तयारी असली, की नैराश्य येत नाही. सध्याही आपण अनेक महान कलावंतांना अगदी छोट्या जाहीरातीत काम करताना पाहतो. मनाची ही तयारीच आपल्याला सदोदित प्रेक्षकांच्या नजरेसमोर ठेवते. त्यामुळेच कोणतीही भुमिका मिळाली तरी त्या भुमिकेला न्याय देण्यासाठी झटण्याची तयारी असली, म्हणजे अपयशाचे तोंड पाहावे लागत नाही.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत