शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब विक्री प्रकरणात कामगारांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा मुद्दा ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 11:42 IST

Khamgaon News : आरोग्य, नगरपालिका प्रशासनासोबतच कामगारांनीही स्वत:हून कुटुंबीयांच्या ट्रेसिंगकडे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  विम्याच्या लाभासाठी ‘निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह’ बनलेल्या शिवांगी बेकर्समधील कामगारांच्या संपर्कातील अनेकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच करण्यात आले नाही.  आरोग्य, नगरपालिका प्रशासनासोबतच कामगारांनीही स्वत:हून कुटुंबीयांच्या ट्रेसिंगकडे  जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.एक लाख २० हजार रुपयांच्या  लाभासाठी जनुना येथील शिवांगी बेकर्स येथील कामगारांनी सामान्य रुग्णालय तसेच खासगी कोविड रुग्णालयातील काहीशी संगनमत करून कोरोना पॉझिटिव्हचे स्वॅब खरेदी केले. बनावट स्वॅबच्या आधारेच शिवांगी बेकर्स कंपनीतील तब्बल ७०-८० कामगारांनी विम्याचा लाभ घेतला तसेच या स्वॅबच्या आधारेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार आणि गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला. गृहविलगीकरणादरम्यान कामगारांना कोणतेही गांभीर्य दिसून आले नसल्याचेही आता समोर येत आहे. पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्यास बडे मासे आणि मोठा घोळ समोर येण्याची शक्यता आहे.

निगेटिव्ह असल्याची खात्री! स्वॅब खरेदी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह म्हणजेच पूर्णत: निगेटिव्ह असल्याची खात्री या कामगारांना होती. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असताना हे कामगार बिनधास्त होते, अशी चर्चा आता शिवांगी बेकर्स कामगारवर्गात रंगत आहे. त्याचवेळी काही कामगारांनी घरावर लावलेले कोरोना पॉझिटिव्हचे स्टीकर्स, पोस्टर्सही फाडल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या