शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

परस्पर वीज जोडणी करणे भोवले; मलकापूर नगराध्यक्षांना अटक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:36 AM

मलकापूर: खंडित केलेला विद्युत पुरवठा खांबावर चढून जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली.  

ठळक मुद्देतीन महिन्यानंतर कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: खंडित केलेला विद्युत पुरवठा खांबावर चढून जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली.  धानोरा खुर्द, धानोरा बु., वडगाव या गावांचा पाणीपुरवठा महावितरणच्या अधिकार्‍यांनी सप्टेंबर २0१७ मध्ये खंडित केला होता. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पिण्याच्या पाण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांनी थेट मलकापूर नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्याशी संपर्क साधला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने अँड. हरीश रावळ यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला; मात्र त्यांनी विद्युत पुरवठा जोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे १९ सप्टेंबर २0१७ रोजी खांबावर चढून नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांनी विद्युत पुरवठा सुरू केला होता. त्याची तक्रार २१ सप्टेंबरला नांदुरा पोलीस स्टेशनला पिंपळगाव राजाचे कनिष्ठ अभियंता विनायक बोतरकर यांनी दिली होती. त्यावरून अप.क्र. ४५६/१७ कलम १३८ विद्युत कायद्यान्वये नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्यासह शिवदास वनारे, बंटी ऊर्फ अमोल पाटील दोघे रा. धानोरा खु. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल ३ महिन्यानंतर नांदुरा पोलिसांनी नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्यासह तिघांना सोमवारी सकाळी अटक केली. अँड. हरीश रावळसह दोघांना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश पाटील यांनी जामिनावर आरोपींची सुटका केली. सरकारतर्फे अँड. विवेक बापट तर आरोपीतर्फे अँड. गणेश पाटील यांनी काम पाहिले. 

शेतकर्‍यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी महावितरणकडून त्यांना वेठीस धरले जात आहे. आता तर ग्रामपंचायतचा पाणीपुरवठासुद्धा खंडित केला जात आहे. हा प्रकार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील - अँड. हरीश रावळ, नगराध्यक्ष, मलकापूर 

टॅग्स :malkapur bypassमलकापूर बायपासbuldhanaबुलडाणाArrestअटक