जांबुळधाबा उपकेंद्राच्या जाळपोळप्रकरणी नगराध्यक्ष हरिश रावळ व आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 08:34 PM2017-12-26T20:34:01+5:302017-12-26T20:40:51+5:30

मलकापूर (बुलडाणा): तालुक्यातील जांबुळधाबा उपकेंद्रावरील खेडेविभागाची लाईट गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त शेतक-यांनी अ‍ॅड.हरिश रावळ, राजु पाटील आदींच्या नेतृत्वात कार्यालयाची जाळपोळ केल्याने याबाबतची तक्रार ग्रामीण पोस्टेला कनिष्ठ अभियंता मराविवि खुपचंद उध्दवराव पवार यांनी दिली. यावरुन ग्रामीण पोलीसांनी अ‍ॅड.हरिश रावळ यांच्यासह ७ ते ८ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले.

Criminal cases filed against city president, Harish Rawal and agitators in Jambuldha sub-center firefight | जांबुळधाबा उपकेंद्राच्या जाळपोळप्रकरणी नगराध्यक्ष हरिश रावळ व आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल!

जांबुळधाबा उपकेंद्राच्या जाळपोळप्रकरणी नगराध्यक्ष हरिश रावळ व आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल!

Next
ठळक मुद्देखंडित विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी सोमवारी कार्यकर्त्यांनी केले आंदोलनआंदोलनकर्त्यांनी केली कार्यालयाची जाळपोळ

लोकमत न्यूज नेटवर्क 
मलकापूर (बुलडाणा): तालुक्यातील जांबुळधाबा उपकेंद्रावरील खेडेविभागाची लाईट गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त शेतक-यांनी अ‍ॅड. हरिश रावळ, राजु पाटील आदींच्या नेतृत्वात कार्यालयाची जाळपोळ केल्याने याबाबतची तक्रार ग्रामीण पोस्टेला कनिष्ठ अभियंता मराविवि खुपचंद उध्दवराव पवार यांनी दिली. यावरुन ग्रामीण पोलीसांनी अ‍ॅड.हरिश रावळ, राजु पाटील, गजानन ठोसर, बंडू चौधरी, विजय पाटीलसह अधिक ७ ते ८ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
जाबुंळधाबा उपकेंद्राअंतर्गत येणा-या खेडे विभागातील दहा डि.पी.गेल्या तीने दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद असल्याने गुराढोरांसह ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व रब्बी पिकांचे हाल लक्षात घेता अ‍ॅड.हरिश रावळ, राजु पाटील सह काँग्रेस पदाधिकाºयांनी शेतकºयांसह उपकेंद्र गाठले उपकेंद्राची जाळपोळ करुन जोपर्यंत विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु होत नाही आम्ही मलकापूर येथील कार्यालयाची जाळपोळ करण्याचा इशारा रावळ यांनी देताच एकातासाच्या आत लाईनमन येवून पुरवठा सुरु केला. कार्यालयाची जाळपोळ केल्याप्रकरणी व कर्मचाºयांना दमदाटी करुन दहशतीचे वातावरण निर्माण करुन मराविमं कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी अ‍ॅड.हरिश रावळ, राजु पाटील, गजानन ठोसर, बंडूभाऊ चौधरी, ज्ञानेश्वर निकम, विजय पाटील, अधिक सात ते आठ आंदोलनकर्त्यांसह एकूण तेरा जणांविरुध्द भारतीय विद्युत अधिनियम १३८ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कलम १४३, ४४८, ४३५, १८६ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सोनवणे करीत आहे. 

जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तर मी माघार घेणार नाही, जनतेच्या सेवेसाठी सैदव तत्पर राहतील
- अ‍ॅड. हरिश रावळ, नगराध्यक्ष
 

Web Title: Criminal cases filed against city president, Harish Rawal and agitators in Jambuldha sub-center firefight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.