शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

देशात लोकशाही ऐवजी 'मॉबोक्रॉसी' - फौजिया खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:36 IST

संविधानाला धोका निर्माण झाला असून त्यासाठी संविधान बचाव रॅली १७ जुलै रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी गुरूवारी बुलडाणा येथे दिली.

ठळक मुद्देसंविधान बचाव मोहिम राष्ट्रवादी काँग्रेसने २६ जानेवारीपासून सुरू केली. एक प्रकारे हा दुसरा स्वातंत्र्य लढा असून राष्ट्रवादी काँग्रेसने याचे नेतृत्व हे महिलांकडे दिले असल्याचे फौजिया खान म्हणाल्या.

बुलडाणा : सत्ताधार्यांच्या कार्यपद्धतीने देशातील लोकशाहीला तथा संविधानाला धोका निर्माण झाला असून एक प्रकारची मॉबोक्रॉसी सुरू आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण झाला असून त्यासाठी संविधान बचाव रॅली १७ जुलै रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी गुरूवारी बुलडाणा येथे दिली. संविधान बचाव मोहिम राष्ट्रवादी काँग्रेसने २६ जानेवारीपासून सुरू केली असून मुंबई, दिल्ली येथे यासंदर्भात कार्यक्रम झाले असून आता प्रादेशिकस्तरावर त्यानुषंगाने आंदोलने करण्यात येत आहे. विदर्भातील हे आंदोलन नागपूर येथे होत आहे. त्या संदर्भात नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात १७ जुलै रोजी दुपारी एक वाजता कार्यक्रम होत असल्याचे त्या म्हणाल्या. या पत्रकार परिषदेस पुण्याच्या माजी महापौर विजया भोसले, अमरावतीच्या सुरेखाताई ठाकरे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मगलाताई रायपुरे, अनिता शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, उपाध्यक्ष नरेश शेळके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगितराव भोंगळ पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. संविधान बचाव रॅलीतंर्गत नागपूर येथे मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनची होळी करण्यात येणार आहे. सध्या राज्यात व देशात अराजकात पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ताधार्यांकडून विरोधकांना कोठेच स्थान दिल्या जात नाही. संविधान धोक्यात आहे. त्याला वाचविण्याची गरज आहे. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. एक प्रकारे हा दुसरा स्वातंत्र्य लढा असून राष्ट्रवादी काँग्रेसने याचे नेतृत्व हे महिलांकडे दिले असल्याचे फौजिया खान म्हणाल्या. दरम्यान, नागपूर येथील या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व राज्यातील सर्व पदाधिकारी सहभागी होणार असल्याचेही फौजिया खान यांनी अधोरेखीत केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेस