शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

काेराेनातून सावरलेल्या बालकांना एमएसआय-सी आजाराचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:03 AM

Childrens suffering from MSI-C disease : काेराेनातून सावरलेल्या बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमएसआय-सी) हा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे.

- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेनाची तिसरी लाट येणार असल्याची तसेच यामध्ये लहान बालके संसर्गीत हाेण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच काेराेनातून सावरलेल्या बालकांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमएसआय-सी) हा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे. या आजाराने ग्रस्त एका बालकावर उपचार सुरू आहेत. आजाराचा धाेका पाहता आराेग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे़काेराेनाची दुसरी लाट शहरांसह ग्रामीण भागात पाेहचली हाेती. काेराेनामुळे अनेक जण गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले हाेते. काेराेनाने अनेकांचा मृत्यूही झाला आहे. जिल्ह्यात ४३० पेक्षा  अधिक बालकांना काेराेना संसर्ग झाला हाेता. काेराेनातून सावरलेल्या बालकांना एमएसआय-सी हा आजार हाेत असल्याचे समाेर आले आहे. या आजारामुळे मुलांना अंगात ताप भरतो. तसेच हा आजार हृदय, मेंदू आणि फुप्फुस अशा महत्त्वाच्या भागांवर हल्ला करतो. तसेच लहान मुलांमध्ये तीन ते पाच दिवस ताप, तीव्र पोटदुखी तसेच रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे सुद्धा आजारात जाणवतात. त्यामुळे, काेराेनातून बरे झालेल्या मुलांकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच तिसऱ्या लाटेत मुलांना काेराेना संसर्ग हाेऊच नये यासाठी उपाय याेजना करण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्ह्यात यासंदर्भाने सर्वेक्षण सुरू आहे. सध्या एक मुलामध्ये अनुषंगीक लक्षणे आढळल्यामुळे सर्वेक्षण सुरू झाले.

अशी आहेत लक्षणे

  •  मुलांना खूप ताप येणे,पाच दिवसांपर्यंत कमी न हाेणे
  •  मुलांच्या पाेटात दुखणे
  •  मळमळ हाेणे, उलट्या हाेणे
  •  स्कीनवर रॅसेस पडणे
  •  डाेळे लाल हाेणे
  •  

 ही घ्यावी काळजीकाेराेना हाेउच नये यासाठी मुलांना मास्क शिवाय बाहेर पडू देउ नये, सतत ताप असल्यास किंवा तीव्र पाेट दुखी असल्यास डाॅक्टरांना दाखवावेमुलांमध्ये लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, मुलांना पाेस्टीक भाेजन द्यावे.काेराेनातून बरे झालेल्या मुलांकडे लक्ष द्यावे.

काेराेनातून बरे झालेल्या शुन्य ते १९ वर्षांच्या मुलांना मल्टी-सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा आजार हाेत आहे. या आजाराची लक्षणे दिसताच तातडीने डाॅक्टरांना दाखवावे़ तसेच मुलांना काेराेना हाेऊच नये यासाठी उपाय याेजना कराव्यात. काेरानातून मुले सावरली असली तरी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे.डाॅ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या