शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

खामगावात युवा मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 2:09 PM

खामगाव : सृष्टी बहुद्देशीय संस्था अकोला व  तरुणाई फाउंडेशन खामगाव  यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे आयोजीत तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सृष्टी बहुद्देशीय संस्था अकोला व  तरुणाई फाउंडेशन खामगाव  यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे आयोजीत तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन पार पडले. येथील कोल्हटकर स्मारक सभागृहात साहित्य संमेलन पार पडत आहे.  या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध नाट्यकर्मी व लेखक राजकुमार तांगडे यांच्याहस्ते झाले. संमेलानाध्यक्ष म्हणून युवा साहित्यीक नवनाथ गोरे तर स्वागताध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण यांची उपस्थिती लाभली आहे. खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, माजी संमेलनाध्यक्ष किशोर बळी, नगराध्यक्षा अनिता डवरे, डॉ. बी. जी. शेखर, प्रा.वंदना दीपक मोरे, प्रा. गजानन भारसाकळे, पत्रकार राजेश राजोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. सकाळी ८ वाजता शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये सहभागी वेगवेगळ््या वेशभुषेतील चिमुकल्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते. साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात जागर शब्दसृष्टीचा स्मरणिकेचे प्रकाशन आणि सूत्रसंचालनाची सूत्रे ई_पुस्तकाचं प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यभरातील शंभरच्यावर साहित्यिक वेगवेगळ्या साहित्यिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झाले आहेत. राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रसिकांना साहित्याची चांगलीच मेजवानी मिळाली आहे. साहित्य संमेलनाला खामगाव शहर व परिसरातील युवक-युवती, शाळा महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, खामगाव शहर व परिसरातील साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. तरुणाई फाऊंडेशनचे कार्यकर्ते संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावliteratureसाहित्य