किर्रर्र अंधार, धडक अन् आरडाओरडा; दुसऱ्या बसमधील २० जण बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 11:57 AM2023-07-30T11:57:58+5:302023-07-30T11:58:42+5:30

जीव वाचलेल्या या प्रवाशांनी मिळेल ते वाहन पकडून घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

in darkness, banging and screaming; 20 people in the bus escaped | किर्रर्र अंधार, धडक अन् आरडाओरडा; दुसऱ्या बसमधील २० जण बचावले

किर्रर्र अंधार, धडक अन् आरडाओरडा; दुसऱ्या बसमधील २० जण बचावले

googlenewsNext

हनुमान जगताप -

मलकापूर (जि. बुलढाणा) : पहाटेचा किर्रर्र अंधार, रस्त्यावर भरधाव वाहनांची गर्दी अशातच अवघ्या काही मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं. महामार्गावर एका ट्रॅव्हल्सने दुसरीला चिरत नेल्याने सहा प्रवासी ठार झाले, २४ गंभीर जखमी झाले. त्याचवेळी मलकापूर नजीकच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या नागपूर-नाशिक रॉयल ट्रॅव्हल्स बसमधील तब्बल वीस जण बालंबाल बचावले. जीव वाचलेल्या या प्रवाशांनी मिळेल ते वाहन पकडून घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या राॅयल कंपनीच्या बसचालकासह एकूण वीस जण बालंबाल बचावले. त्यापैकी चालक विक्रांत अशोक समरीत (रा. अमरावती) व संगीता पोद्दार (रा. नागपूर) यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. 

सारेच हादरले
अपघातानंतर राॅयल ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधील चालकासह वीस प्रवासी खाली उतरले. घटनास्थळी होत असलेला आरडाओरडा ऐकून सारेच हादरले. प्रत्येक जण आपापल्या नातलगाला शोधत होता. सुखरूप असल्याची खात्री करून घेतल्यानंतर अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला. पण त्याचवेळी समोरच्या बसमधील प्रवाशांची झालेली जीवितहानी प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. चालकासह जखमी महिलेला पोलिसांनी उपचारासाठी हलविले.
 

Web Title: in darkness, banging and screaming; 20 people in the bus escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.