शेतशिवारात मृतदेह आढळल्याने खळबळ,पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल
By सदानंद सिरसाट | Updated: February 27, 2024 17:05 IST2024-02-27T17:03:53+5:302024-02-27T17:05:30+5:30
शेतशिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शेतशिवारात मृतदेह आढळल्याने खळबळ,पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल
सदानंद सिरसाट,संग्रामपूर (बुलढाणा) : शेतशिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोलद येथील गजानन मोतीराम देऊळकार या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह २७ फेब्रुवारी रोजी सकाळी माळेगाव रस्त्यालगत एका शेतात आढळून आला.
मृतकाच्या अंगावर मारहाणीचे वळ, तसेच डोक्यावर आणि छातीवर जबर मार लागल्याचे आढळून येत असल्याने, त्या व्यक्तीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच, तामगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सत्रांनी दिली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आल्याचे समजते. वृत्त लिहिपर्यंत श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले नव्हते. घटनास्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.