धक्कादायक! बुलढाण्यात विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
By संदीप वानखेडे | Updated: May 18, 2024 16:44 IST2024-05-18T16:44:07+5:302024-05-18T16:44:22+5:30
पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

धक्कादायक! बुलढाण्यात विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
संदीप वानखडे, पिंपळगाव सराई : पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुलढाणा तालुक्यातील पांगरी येथे १८ मे राेजी घडली. विजय रामकृष्ण गवई असे मृत युवकाचे नाव आहे.
पांगरी येथील विजय गवई हा १८ मे राेजी नळाचे पाणी भरत हाेता. दरम्यान, नळावर लावलेल्या विद्युत माेटारची पिन काढत असताना त्याला विजेचा जबर धक्का लागला. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येत्याच विजयला उपचारासाठी बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचा सांगितले. विजय गवई याचे एक महिन्यापूर्वीच लग्न झालेले होते. माेलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा प्रपंच चावलत हाेता. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत रायपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला नव्हता.