शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मदरशांचा समावेश झाल्यास ‘शाळाबाह्य’ची संख्या वाढणार

By admin | Updated: July 6, 2015 23:58 IST

सर्वेक्षणानुसार बुलडाणा जिल्ह्यात ६६२ मुले; मदरशांची तपासणी नाहीच.

खामगाव : राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त चमुने जवळपास ५ लाख ३0 हजार ७४६ कुटुंबियांना भेट देऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्यामध्ये एकूण जिल्ह्यात ६६२ शाळाबाह्य मुले आढळली; मात्र या सर्वेक्षणामध्ये एकाही मदरशाचा समावेश नसल्याने जिल्ह्यात असलेल्या २२ अधिकृत मदरशांसोबतच इतर अनधिकृत मदरसे, वेदशाळा यांची संख्या गृहीत धरल्यास शाळाबाह्य मुलांची संख्या वाढणार आहे.शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात एकूण ६६२ शाळाबाह्य मुले आढळली. त्यात ३0१ मुलींचा समावेश आहे. बुलडाणा तालुक्यात एकूण २९ शाळाबाह्य मुले आढळली, त्यात २१ मुले, ८ मुली. चिखली तालुक्यात एकूण ४२, मुले २0, मुली २१. दे.राजा एकूण १२, मुले ८, मुली ४, सिं. राजा एकूण १४, मुले ७, मुली ७. लोणार ४0, मुले १९, मुली २१. मेहकर १0, मुले ४, मुली ६. खामगाव १९४, मुले ११३, मुली ८१. शेगाव ४0,मुले ३१, मुली ९. संग्रामपूर १६९, मुले ८७, मुली ८२. जळगाव जा. ३0, मुले ९ , मुली २१. नांदूरा १४, मुले ७, मुली ७. मलकापूर एकूण २१, मुले ११, मुली १0. मोताळा एकूण ४८, मुले २४ मुली २४, असे एकूण ६६२ शाळाबाह्य मुले आढळली आहेत. बुलडाणा शहरात एकूण ७ शाळाबाह्य बालक आढळून आलेत, त्यात ४ मुले, ३ मुलींचा समावेश आहे. ही संख्या अधिकृतरीत्या जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली असली तरी सूत्रांच्या मते ही संख्या अजूनही वाढू शकते. मदरशांचा समावेश करण्यात आल्यास ही संख्या पाच हजारापेक्षाही जास्त होण्याची भीती शिक्षणक्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.*अधिकृत २२ मदरसेवक्फ बोर्डाकडे नोंद असलेले बुलडाणा जिल्ह्यात अधिकृत २२ मदरसे आहेत. या मदरशांमध्ये ३ हजारापर्यंत विद्यार्थी असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याशिवाय अधिकृत नोंद नसलेले मरदसेसुद्धा जिल्ह्यात आहेत.; मात्र त्याबद्दल प्रशासनाकडे माहिती नाही.